गुन्हेगारी
सर्पदंशाने चिमुकल्याचा मृत्यू
सांगोला : विशेष प्रतिनिधी
अचानक सर्पदंश झाल्याने पाचवर्षीय बालकाचा वेळेत उपचार मिळू शकले नसल्याने तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोळे (ता. सांगोला) येथे घडली आहे.
स्वराज आलदर (वय ५) असे मृत बालकाचे नाव आहे. स्वराज आलदर या पाच वर्षाच्या मुलास सिद्धनाथ नगर येथे सर्पदंश झाला होता. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
शहाजीबापूंनी अनिकेत देशमुखांचा हात धरला अन् समर्थकांनी केला जल्लोष