सरत्या वर्षाला निरोप देताना/ नाना हालंगडे
दुष्काळ सदृश्य परिस्थिती, पंचायत समिती,नगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी वर्ग बेताल,कामकाज ठप्प, भ्रष्टाचार बोकाळला, सूतगिरणी , महिला सूतगिरणी, खरेदी-विक्री संघ, उत्पन्न बाजार समिती, चार ग्रामपंचायत निवडणुका, गुन्हेगारीचे मोठ्या प्रमाणात वाढ, रोगामुळे डाळिंब बागा नष्ट, त्यामुळे उलाढाल ठप्प, बाजारपेठेतील व्यवसाय संकटात, 2023 वर्षात शासकीय विकास कामासाठी निधी मोठ्या प्रमाणात, ठेकेदार व इतर वर्ग मालामाल, तर सर्वसामान्य नागरिक शेतकरी व्यापारी छोटे-मोठे व्यावसायिक हालात, अशी परिस्थिती 2023 मध्ये घडलेली आहे. धडाकेबाज कामांमुळे आमदार शहाजीबापू पाटील यांची इमेज उजळून निघाली आहे.
शासनाच्या योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचे काम पंचायत समिती व नगरपालिका या संस्था करीत असतात. संस्थावर प्रशासक असून लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अंकुश राहिला नाही. प्रशासक अधिकारी वर्ग धूमकेतूप्रमाणे कधीही उगवतात त्यामुळे नागरिकांना कामासाठी हेलपाटे घालावे लागले भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला, पैसे दिल्याशिवाय काम नाही ही भूमिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली.
तसे पाहता प्रशासक असल्याने आमदार शहाजी पाटील यांना त्याचा फायदा झाला कारण पंचायत समिती नगरपालिका या या संस्थेवर दुसऱ्या पक्षाची सत्ता असते तर आमदार पाटील यांना ज्या काही योजना आणणे गरजू लोकापर्यंत पोहोचविणे हे अडचणीचे झाले असते कारण 1995 ला हे त्यांना दिसून आले होते त्यामुळे गेली दोन वर्ष आमदार पाटील हे खऱ्या अर्थाने तालुक्यात सर्वेसर्वा आहेत तसेच त्यांच्याच विचाराचे सर्व अधिकारी त्यांना आणता आले व त्यांना पाहिजे तसा दोन हजार कोटी विकास निधी पोहोचविता आला हे वैशिष्ट्य घडले आहे.
दुष्काळ सदस्य परिस्थिती असली तरी अद्याप चाऱ्याची व पिण्याची पाण्याची टंचाई 2023 मध्ये जाणवली नाही परंतु उजनीतील पाणी कमी झाल्याने व उजनी धरणावर सांगोला शहर व तालुक्यात पिण्याच्या पाण्यावर जनता अवलंबून असल्याने जानेवारीपासून पिण्याचे पाण्याचे संकट निर्माण होण्याची भीती आहे सूतगिरणी महिला सूतगिरणी कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ या सहकारी संस्था व सावे वाडेगाव खवासपूर येथील ग्रामपंचायत निवडणुका होऊन शेकापने आपले प्राबल्य कायम ठेवली तर आमदार शहाजी पाटील यांचे गावात त्यांना आपले वर्चस्व ठेवण्यात यश आले.
गुंठेवारी बंद असल्याने सर्वसामान्यांना गुंठावर जागा घेऊन घर बांधणे थांबले आहे डाळिंबामुळे सांगोल्याचे नाव जगात पोचले परंतु रोगामुळे बागा नष्ट झाल्या शेतकरी उध्वस्त, अनेक व्यावसायिक संकटात, शेतमजुरांचा रोजगार बुडाला तालुक्या तील गावोगावच्या बाजारपेठा ठप्प झाल्या त्यामुळे हा संपूर्ण वर्ग 2023 मध्ये कर्जबाजारी झाला आहे
तालुक्यात 2023 मध्ये दोन हजार कोटीहून अधिक विकास निधी आमदार शहाजी पाटील यांनी आणला अनेक विकास कामे जोरात सुरू आहेत काही पूर्णही झाले आहेत त्यांचे उद्घाटन डिसेंबर अखेर अथवा पुढील वर्षी 24 मध्ये होतील त्यामुळे ठेकेदार लोखंडी सामान विक्रेते बाहेरच्या राज्यातून आलेले व्यापारी व इतर सर्व वर्ग आज मालामाल झालेला दिसत आहे.
पूर्वी कामाचे प्रस्ताव पाठवले जात होते आणि निधीची वाट पाहवी लागत होती आता परिस्थिती उलट झालेले आहे आमदार शहाजी पाटील यांनी निधी मोठ्या प्रमाणात आणला परंतु प्रस्ताव मंजुरी नसल्यामुळे निधी पडून राहिला आहे तो माझे पर्यंत खर्ची पडला तर ठीक नाहीतर तो निधी परत जातो का अशी परिस्थिती आहे लिंगायत समाजासाठी समाज मंदिर व इतर कामासाठी 85 लाख रुपये निधी, परीट समाज मंदिरासाठी निधी येऊन पडला आहे परंतु जागे अभावी काम थांबले आहे अशी परिस्थिती आहे.
तालुक्यात केंद्राची जलजीवन योजनेअंतर्गत हर घर योजनेसाठी तीनशे कोटी रुपयाची कामे तालुक्यात चालू आहेत परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला म्हणून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता यांची दोन वेळा चौकशी कमिटी नेमली परंतु अद्याप चौकशी झाली का नाही स्पष्ट झाले नाही परंतु सदर अधिकारी गेली पाच वर्षे मात्र सांगोला येथे ठाण मांडून आहे.
भूमी अभिलेख उपाधीक्षक यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला म्हणून त्यांच्यावर चौकशी कमिटी नियुक्ती केली आहे दोन महिन्यात दोन्ही अधिकाऱ्यांचे अहवाल सादर करावा असा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश होता परंतु गेली चार महिने झाले अद्याप काही निर्णय झाला नाही त्यामुळे ते दोष मुक्त असल्याची चर्चा आहे आता आरोप करणाऱ्यावर कारवाई होते का याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन झाली कुणबी नोंदी शोधण्याचे काम चालू असून आत्तापर्यंत 89 नोंदी आढळून आलेल्या आहेत वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात असली तरी 2023 मध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मोठे आहे परंतु तस्करी मात्र थांबली नाही मावा गुटख्यावरही धाडी मोठ्या प्रमाणात पडले आहेत कोट्यावधी रुपयांचे गुटखा जप्त केला आहे.
परंतु हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात राजरोसपणे चालूच आहे महिलांना एसटी त सूट दिल्याने महिला प्रवासी संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे 2023 मध्ये सांगोला एसटी आगाराच्या उत्पन्नाची वाढ झाली आहे परंतु खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वडाप वाहतूक करणारे चालक-मालक यांचा धंदा बसला आहे टेंभू म्हैसाळ सांगोला शाखा कालवा निरा उजवा कालवा या योजनेची पाणी सुटल्याने रब्बी हंगाम जोमात आहे.अशा घटनेने 2023 साल संपत आहे व 2024 वर्ष येत आहे.