ताजे अपडेट
भोपसेवाडीत शॉर्ट सर्किटमुळे कडबा जाळून खाक
सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे शेतात ठेवलेला कडबा जाळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २० मार्च रोजी घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी येथे विजय आबा गावडे हे शेतात राहतात. त्यांच्या शेतात विहिरीवरील विद्युत कनेक्शनचे शॉर्ट सर्किट होऊन त्याच्या ठिणग्या पडून गवताने पेट घेतला. त्यामुळे शेजारीच असलेला जनावरांसाठीचा कडबा पेटला. यामध्ये ज्वारीचा कडबा ३००० पेंड्या, मक्याचा कडबा १००० पेंड्या जागेवरच जाळून खाक झाला. सदरच्या कडब्याची बाजार भावाप्रमाणे किमत अंदाजे ५५ हजार इतकी आहे.
या घटनेचा पंचनामा तलाठी, पोलीस पाटील यांनी केला आहे. पंचनाम्याचा अहवाल तहसीलदार यांना देण्यात आला आहे.