महिला-मुक्तीची क्रांतीज्योत

डॉ. घपेश पुंडलिकराव ढवळे यांचा विशेष लेख

Spread the love

स्त्री शिक्षण म्हणजे स्त्रियांना थातूरमातूर साक्षरतेचे शिक्षण देणे नव्हे, तर त्यांचे साशक्तिकरण, सर्वांगिण विकास आणि मानव मुक्ती ही व्यापक जाणीव आज स्त्री शिक्षणाबाबत देशात झाली पाहिजे, अशी शिकवण देणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज 3 जानेवारी हा जयंती दिन या निमित्ताने…

21व्या शतकात महिलांकडे बघण्याचा दृष्टिको कोणात बदल झाला आहे. यास प्रारंभ झाला तो 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात ज्योतिरावांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेपासून. त्या शाळेत पहिली शिक्षिका म्हणून काम करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील खुळचट चालीरीती, संस्कृती ,परंपरा ,भेदाभेद, महिला शिक्षणाच्या विरोधात झुगारून जोतीरावांच्या खांद्याला खांदा लावून महिलांच्या मुक्तीचा मार्ग खुला केला, 81950 नंतर भारतीय संविधानामध्ये महिलांसाठी मानवी अधिकारांची विशेष तरतूद केल्या गेल्यामुळे महिलांना आज स्वाभिमान आणि सन्मानाचे जगणे शक्य झाले पण ते मुहूर्तमेढ मात्र ज्योतिराव आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई च्या पुढाकाराने झाली होती.

त्या काळात पुणे हा सनातन्यांचा बालेकिल्ला स्त्रियांना त्यातही शूद्र आणि अतिशूद्र या जातीतील स्त्रियांना शिक्षण घेणे हा त्या सनातन्यांच्या दृष्टीने अत्यंत भयंकर भ्रष्टाचार होता. महान पातक होता होते. शूद्रांच्या घरी विद्या विद्या आणि ज्ञान चालले, असे ते ओरडू लागले. शास्त्राप्रमाणे महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही. त्यांना शिक्षण देणे म्हणजे देव-धर्म समाजाविरुद्ध वर्तन करणे होय. हिंदू शास्त्राच्या मते स्त्रियांना विद्येचा अधिकार नव्हता स्त्री ही विश्वासास अपात्र, त्याचप्रमाणे दृष्ट चंचल, अविचारी आणि गुलाम म्हणून मानण्यात येई. मुलींनी शिक्षण घेतले तर तिला अकाली वैद्यत्व येते, अशी समजूत होती.

स्त्रियांनी पायात जोडे वाहना घालणे अपवित्र गोष्ट समजून तिने छत्री वापरली तर पुरुषाचा उपमर्द या. एकदा एक जोडपे दिवसा गप्पागोष्टी करताना आढळले.मुलाच्या बापाने त्या उभयंता या अपमाना बद्दल एक दिवसभर खोलीत कोंडून ठेवले.स्त्रीने स्वतःच्या नवऱ्याच्या पंक्तीत जेवण ही अपमानकारक गोष्ट समजली जात असे.सासर्‍याचे गाव सोडून नवरा जेथे नोकरी किंवा धंदा करीत असेल ्याच्याजवळ मुलीने राहणेही वडीलधार्‍यांना खपत नसे. त्या तरुण पत्नीला सासऱ्यांच्या घरात राहावे लागे. स्त्री ही परतंत्र अबला.

विद्याभ्यासाने तिची पापाचरण आकडे प्रवृत्त होईल, तिच्या बुद्धीने वागले असता सर्वस्वी नाश होतो. स्त्री ही दोषाची आणि अज्ञानाची खान होय. तिला शिकवणे म्हणजे वेड्याच्या हाती कोलीत देण्यासारखे आहे. शिवाय इतर जातीच्या मुलीवर ती शाळेत बिघडून जाईल असे वाटे. धर्म सामाजिक परंपरा आणि तिचे जीवन जखडून ठेवले होते.

परिवर्तनबाबत ज्योतिबा बंडखोर होते आणि तेवढ्याच तत्परतेने त्यांना साथ देणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई. लोकांना वाटे फुले दांपत्य समाज आणि बहुमताची पर्वा करीत नाहीत. पण, फुले दांपत्य देहभान विसरून पराकोटीच्या निष्ठेने कार्य करीत होते. त्यांची प्रतिभा आणि पराक्रमही सडलेल्या चालीरीती आणि देशकालच्या प्रतिकूल सामाजिक परंपरा विरुद्ध बंडा करून उठली होती. अंधश्रद्धेची ही रात्र भारतात संपता संपत नव्हती.दृष्ट चालीरीती आणि खोटे पूर्वग्रह यांनी समाजाच्या अनेक घटकांना जर्जर केले होते. सावित्रीबाईंनी त्या क्रूर चालीरीतींचा धिक्कार केला.

त्यासाठी स्वतः पतीकडून शिक्षण घेऊन, समाजातील मुलींसाठी शिक्षिका झाली. एका महिलेने शिक्षिकेचे काम करणे ही त्याकाळी अत्यंत समाजद्रोही आणि धर्मद्रोही गोष्ट मांनण्यात आली. संतापाची प्रचंड लाट उसळली, स्त्रीने समाजाची बंधने तोडून शिक्षिकेचे काम करावे. ही गोष्ट त्यांना अपवित्र, अभूतपूर्व वाटली नवे, तो राष्ट्रीय अपमान वाटलात्यावेळेस विरोधक सावित्रीबाई शाळेत जाताना दिसतात मार्गात तिच्या अंगावर चिखलफेक करीत, घाण टाकी त, दगड मारीत, प्रतिदिनी घराकडे शाळेत जाताना हे दुःख तिला सहन करावे लागे.

विरोधकाच्या बेफाम विरोधकाला घाबरून सावित्रीने मात्र कच खाल्ली नाही. आपल्या जीवित कार्यात प्रारंभ करताना आपल्या विषयी आणि आपल्या कार्याविषयी गैरसमज. निंदा आणि विपर्यास होईल, याची कल्पना त्यांना क्षणोक्षणी येत होती. पण, त्या महिला सक्षमीकरणाच्या आपल्या ध्येयापासून मागे हटल्या नाहीत. त्यासाठी ज्योतीबांनी ही त्यांना मोलाचे सहकार्य केले. सावित्री माई चा शिक्षण क्षेत्रात प्रवेश झाल्यापासून स्त्री पुन्हा सार्वजनिक क्षेत्रात उतरली, असे म्हणावयास हरकत नाही.

1990 सालच्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्यान्वये भारतात महिला चे हितरक्षण करण्याच्या उद्देशाने 31 जानेवारी 1991 रोजी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली. आयोगाने नुकतेच 30 वर्ष पूर्ण केली आहेत. कायद्यात काही कमतरता किंवा दुरुस्त्या सुचविण्याचे काम आयोग करतो.त्याचप्रमाणे पण तक्रारी तसेच महिलांवरील अत्याचार किंवा त्यांचे हक्क दडपण्याचा प्रकारांमध्ये न्याय मिळवून देतो. दोन ऑगस्ट 19 91 ते 2 फेब्रुवारी 2012 या कालावधीत आयोजन 144 राष्ट्रीय विभागीय चर्चासत्र, परिषदा कार्यशाळा आयोजित केल्या.देशातील एक यंत्रणा या कामात कार्यरत असूनही महिलावरील अत्याचार, बलात्कार, खून मानसिक शारीरिक त्रास,यांचे सशक्तीकरण करण्यास सरकार मागे पडताना दिसते. या सर्व बाबींचा विचार केल्यास अठराशे 48 मध्ये महिला स-शक्तिकरण करणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कसे शक्य झाले असेल ?

1 जानेवारी 1948 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे रोपटे लावले. या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. निव्वळ वाढ म्हणजे विकास नव्हे, महाराष्ट्रातील एखाद्या भागाचा विकास म्हणजे राज्याचा विकास नाही.शिक्षणा त्याच्याप्रमाणे विस्तार आत्मक वृद्धि व गुणात्मक वृद्धि, या दोघांनाही महत्त्व असते. त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणातही अशीच बुद्धी झाली पाहिजे. तरच आपण क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्री माई फुले यांच्या स्वप्नातील महिला विकास आणि सशक्तीकरण करण्यास यशस्वी होऊ नाहीतर त्यांनी भिडे वाड्यात लावलेली मुहूर्तमेढ रोपटे यशस्वी होणार नाही.

डॉ. घपेश पुंडलिकराव ढवळे
नागपूर
ghapesh84@gmail.com
Mob. No.8600044560

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

One Comment

  1. अतिशय अभ्यास पूर्ण असा लेख . अनेक नव्या गोष्टी समजल्या.
    लेखकास धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका