शिवसेनेसोबत जावू शकतो तर, भाजपसोबत का नाही?
बंडानंतर अजित पवार यांचा खडा सवाल
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता, असं अजित पवार यांनी सांगितलं. शिवसेनेला जातीयवादी म्हणून संबोधलं जात होतं. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि आम्ही गेलो. जर ज्या पक्षाला जातीयवादी म्हटलं जातं त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो तर मग भाजपसोबत जाण्यात काय अडचण आहे?, असा सवाल अजित पवार यांनी केला. (Deputy Chief Minister Ajit Pawar Pres Conference)
अजित पवार यांनी आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झाल्याचं स्पष्ट केलं. आम्ही आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या नावाने आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच भाजपसोबत जाण्याबाबत आमच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर त्याला मूर्त स्वरुप आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. (Chief minister Eknath Shinde)
शिवसेनेला जातीयवादी म्हणून संबोधलं जात होतं. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि आम्ही गेलो. जर ज्या पक्षाला जातीयवादी म्हटलं जातं त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो तर मग भाजपसोबत जाण्यात काय अडचण आहे?, असा सवाल अजित पवार यांनी केला. आम्ही नागालँडमध्ये भाजपसोबत गेलो आहोत. मग महाराष्ट्रात विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत का जाऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.
आज काही जण पोहोचू शकले नाहीत. काहीजण परदेशात आहे. विशेषत: मी लोकप्रतिनिधींविषयी बोलतो. त्यांच्याशी मी संपर्क साधलाय. त्यांनी मान्यता दिली आहे. काही जण आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आमच्यासोबत जास्तीत जास्त आमदार आणि खासदार आहेत, असा दावाही त्यांनी केला.
राजकीय भूकंपाने महाराष्ट्र हादरला
भाजपने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरवला आहे. राष्ट्रवादीच्या तब्बल चाळीस आमदारांसह अजित पवार हे भाजप, शिवसेनेच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. हा शरद पवारांना धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करत महायुतीचे सरकार खाली खेचून भाजप सोबत घरोबा करून सत्ता स्थापन केली होती. त्याच राष्ट्रवादीला सोबत घेऊन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकार चालवावे लागणार आहे.
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे.
अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा अत्राम, अनिल पाटील, अदिती तटकरे, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळही मंत्री बनले. अजित पवार यांनी भाजप-शिंदे गटासोबत जाऊ नये म्हणून सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. पण अजित पवार यांनी कुणाचं ऐकलं नाही. बैठकीनंतर ते तडक आमदारांना घेऊन ते राजभवनावर गेले आहेत.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
छगन भुजबळ
किरण लहमाटे
निलेश लंके
धनंजय मुंडे
रामराजे निंबाळकर
दौलत दरोडा
मकरंद पाटील
अनुल बेणके
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी
अदिती तटकरे
शेखर निकम
निलय नाईक
अशोक पवार
अनिल पाटील
सरोज अहिरे
One Comment