थिंक टँक स्पेशलराजकारण

सांगोल्यात काय होणार? दीपकआबा कोणासोबत? अजित पवार की शरद पवारांसोबत?

Spread the love

माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांचे अजित पवार यांच्यासोबत फार काही सख्य आहे असे आजवर दिसून आले नाही. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे शरद पवार यांना आपले दैवत मानतात. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तो राजीनामा मागे घ्यावा यासाठी माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी भावनिक होऊन आवाहन केले होते.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. बाळासाहेब मागाडे
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा करून उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांच्या या भूमिकेचे राज्यातील राष्ट्रवादीत मोठे पडसाद उमटणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला तालुक्यात पक्षाचे नेते तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे अजित पवार की शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्यासोबत जाणार याची तालुकावासियांना मोठी उत्सुकता लागली आहे.

भाजपने (BJP Maharashtra) पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरवला आहे. राष्ट्रवादीच्या तब्बल चाळीस आमदारांसह अजित पवार हे भाजप, शिवसेनेच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. हा शरद पवारांना धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे (Maharastra CM Eknath Shinde) यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करत महायुतीचे सरकार खाली खेचून भाजप सोबत घरोबा करून सत्ता स्थापन केली होती. त्याच राष्ट्रवादीला सोबत घेऊन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकार चालवावे लागणार आहे.

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाला आहे. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे भाष्य केले. इडीची चौकशी लागल्याने अनेकजण अस्वस्थ होते. त्या भीतीपोटी हे कृत्य झाल्याचा संताप शरद पवार यांनी व्यक्त केला होता. नवीन पिढीला सोबत घेऊन आता नव्याने पक्ष बांधणी करणार असल्याचं शरद पवार यांनी घोषित केले. प्रफुल्ल पटेल (NCP Leader Prafull Patel) आणि सुनील तटकरे यांच्यावर पक्ष आणि एकसंघ ठेवण्याची मोठी जबाबदारी दिली होती. मात्र त्यांनी ती प्रामाणिकपणे निभावली नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे पवार म्हणाले.

सांगोल्यात काय होणार?
सांगोला तालुका हा राष्ट्रवादीचा (Sangola NCP) बालेकिल्ला समजला जातो. या तालुक्यात राष्ट्रवादीचं मोठे संघटन आहे. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील (Ex MLA Deepak Salunkhe-Patil) हे तालुक्याचे नेतृत्व करतात. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांचे शरद पवार यांच्या सोबत अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्यावर शरद पवारांच्या प्रचाराची जबाबदारी होती. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत सांगोल्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाईल असे अपेक्षित होते. मात्र नेहमीप्रमाणे ती जागा शेतकरी कामगार पक्षाकडे गेली. भाई गणपतराव देशमुख (SKP Leader Ganpatrav Deshmukh Sangola) यांनी निवडणुकीत न उतरता आपले नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उभे केले. वस्तुतः शेतकरी कामगार पक्षाच्या वर्षानुवर्षे पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळेस जागा सोडावी असा सर्वांचा आग्रह होता. मात्र तर झाले नाही. नाराज झालेल्या माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी तत्कालिक शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील (Shivsena MLA Shahajibapu Patil Sangola) यांना साथ दिली. शहाजी पाटील हे मोठ्या मतांनी विजयी झाले.

रविवारी अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद मिळवले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तब्बल नऊ मंत्री बनले. अशा स्थितीत दिवसभर गदारोळ सुरू होता. अजित पवार यांच्यासोबत नेमके कोण कोण आमदार गेले त्यांची नावे अद्यापही पूर्णपणे समोर आली नाहीत. तर दुसरीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा बळकटी देऊन नव्या दमाच्या तरुणांना पक्षात संधी देऊन पक्ष वाढवणार असल्याचे सूतोवाच केले. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी दुफळी पडली आहे. अशा स्थितीत सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे कोणासोबत जाणार? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

सहा तारखेला शरद पवारांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी येत्या सहा तारखेला पक्षाची बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीत कदाचित हे चित्र स्पष्ट होईल.

याबाबत थिंक टँक न्यूज नेटवर्कने माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे.

दीपकआबा काय भूमिका घेऊ शकतात?
माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांचे अजित पवार यांच्यासोबत फार काही सख्य आहे असे आजवर दिसून आले नाही. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे शरद पवार यांना आपले दैवत मानतात. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तो राजीनामा मागे घ्यावा यासाठी माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी भावनिक होऊन आवाहन केले होते.

त्यामुळे एकूण राजकीय परिस्थितीचा विचार केल्यास माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे अजित पवार की शरद पवार यांच्या सोबत जाणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, ते आपले दैवत शरद पवार यांच्या सोबतच राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ते नेमके काय भूमिका घेणार हे काही तासातच कळू शकेल.
———
महाराष्ट्रातील सत्तानाट्याचे क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही थिंक टँकवर प्रसिद्ध करत आहोत..
खालील लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता.

https://chat.whatsapp.com/JVRwE8MvDut9QFpmusmqPj

https://chat.whatsapp.com/JVRwE8MvDut9QFpmusmqPj

शिवसेनेसोबत जावू शकतो तर, भाजपसोबत का नाही?

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका