सोलापूर : विशेष प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा प्रवक्तेपदी ॲड. महादेव कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. ॲड. महादेव कांबळे हे सुप्रसिद्ध कवी तथा साहित्यिक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी ॲड. महादेव कांबळे यांना प्रवक्ते पदाचे नियुक्ती पत्र दिले आहे.
ॲड. महादेव कांबळे यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदावर व सांस्कृतिक विभाग राज्य उपाध्यक्षपदी काम केले होते.
त्यांचे शिक्षण बीए LLB तसेच एम ए झाले आहे. आक्रमकपणे भूमिका मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यास ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नेटाने आणि ताकदीने मांडणार असल्याचा संकल्प कांबळे यांनी बोलून दाखविला.