प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व ॲड. सचिन देशमुख युवा मंचतर्फे मोफत कम्युनिटी कौशल्य प्रशिक्षण कॅम्प व व जनरल ड्युटी असिस्टंट कोर्स हेल्थकेअर प्रशिक्षणाचे आयोजन
सांगोला/प्रतिनिधी
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व अॅड. सचिन देशमुख युवा मंचच्या वतीने कोळा तालुका सांगोला येथे मोफत कम्युनिटी कौशल्य प्रशिक्षण कॅम्प व व जनरल ड्युटी असिस्टंट कोर्स हेल्थकेअर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कॅम्प २० मार्चपासून सुरू होणार असून यासाठी मोजकेच प्रवेश देण्यात येणार आहेत.
फूड अँड बेवरेज सर्विस असोसिएट या कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असून या कोर्सचा कालावधी ३० दिवस अनिवासी आहे. हा कोर्स १८ ते ३५ वयोगटातील प्रशिक्षणार्थीना करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. अनुभवी व प्रशिक्षक प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणानंतर लगेच रेस्टॉरंट, थ्री स्टार, फोर स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. १००% प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी आधार कार्ड मार्कशीट दोन फोटो व शाळा सोडल्याचा दाखला ची प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर रेस्टॉरंट व पंचतारांकित हॉटेल्स रिसॉर्ट इत्यादी मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी प्रशिक्षणार्थीना मिळणार आहे.
तसेच जनरल ड्युटी असिस्टंट कोर्स (हेल्थकेअर) या कोर्सचा कालावधी ६० दिवसांचा असून किमान दहावी पास व त्यापुढील शिक्षण घेतलेल्या १८ ते ३५ या वयोगटातील प्रशिक्षणार्थीना प्रवेश देण्यात येणार आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रथम या जागतिक मानांकित असलेल्या संस्थेचे मान्यता प्राप्त सर्टिफिकेट दिले जाणार आहे.
तरी सांगोला तालुक्यातील युवकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी बापूसाहेब ठोकळे सांगोला ९४२१०४१४३३ संतोष करांडे कोळा ९५६५०५१०१६, तुषार माने कोळा ८७८८०९२४९६ अतुल फासले नाझरा ७७६७८६७९७७ नंदू मोरे कोळा ७८७५७४७४७५ यांच्याशी संपर्क साधावा.