निवडणुकीची नांदी; सोलापूरच्या पोलीस आयुक्तांची बदली
सोलापूर : विशेष प्रतिनिधी
राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 42 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये सोलापूरच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. नूतन पोलीस आयुक्त म्हणून एम. राजकुमार यांना नियुक्ती मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया करण्यात आली आहे.
सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना सहसंचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना पदोन्नतीने सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे.
बी.जी. शेखर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) म्हणून बदली झाली आहे. इतर बदल्यांमध्ये रितेश कुमार, अमितेश कुमार, प्रभात कुमार, रविंद्र कुमार सिंगल, शिरीष जैन, दीपक पांडे, दत्तात्रय कराळे, संजय शिंदे, प्रवीण कुमार, प्रवणीकुमार पडवळ, संजय दराडे, ज्ञानेश्वर चव्हाण, एस. डी. एनपुरे, एन.डी. रेड्डी, संदीप पाटील, विरेंद्र मिश्रा, रंजन कुमार शर्मा, नामदेव चव्हाण, राजेंद्र माने, विनिता साहु, एम. राजकुमार,
अंकित गोयल, बसवराज तेली, शैलेश बलकवडे, शहाजी उमाप, एस.जी. दिवाण, संजय शिंत्रे, मनोज पाटील,, विक्रम देशमाने, पंकज देशमुख, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, अजय कुमार बन्सल, रविंद्रसिंह परदेशी, रागसुधा आर., संदीप घुगे, मुमक्का सुदर्शन, धोंडोपंत स्वामी, पंकज कुमावत, मितेष घट्टे, विक्रम साळी, आनंद भोईटे, संदीप पखाले, रमेश धुमाळ व समाधान पवार यांचा समावेश आहे.