गुन्हेगारी

सोलापूरात मोठा कट उधळला, 2 परदेशी बनावटीचे पिस्टल व 5 जिवंत काडतुसे जप्त

MIDC पोलिसांची धाडसी कारवाई

Spread the love

सदरील आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्यावर एमआयडीसी, जेलरोड, जोडभावी पेठ पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी जबरी चोरी करत असताना दुखापत करणे तसेच घरफोडी सारखे विविध गुन्हे दाखल आहेत.

सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
सोलापूर शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका सराईत गुन्हेगारीकडून 2 परदेशी बनावटीचे पिस्टल व 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकामी पोलीस आयुक्त राजेंद्र माने व पोलीस उप-आयुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक विक्रम रजपूत यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस उप-निरीक्षक विक्रम रजपूत व त्यांचे पथक हे अवैध शस्त्र बाळगणारे व विक्री करणाऱ्या संशयीतांच्या पाळतीवर होते.

पथकातील पोहेकॉ राकेश पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम परदेशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकरीता सुनिल नगर, एमआयडीसी, पाण्याच्या टाकीजवळ येथे येणार आहे. त्यानुसार त्यांनी सदरची माहिती पोलीस उप निरीक्षक विक्रम रजपूत यांना दिली.

मिळालेल्या बातमीनुसार दि.01.10:2023 रोजी मध्यरात्री 01.00 वा. चे | सुमारास पोलीस उप-निरीक्षक रजपूत व त्यांचे पथक सुनिल नगर पाण्याच्या टाकीजवळ सापळा लावुन थांबले असता तिथे काही वेळाने एक इसम हातात पिशवी घेऊन चालत येत असल्याचे दिसले. सदरचा इसम दिसताच बातमीदाराने इशारा केला.

त्यावेळी याळगी यांनी त्यास थांबण्यास सांगीतले असता तो संशयीत इसम पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा डी.बी. पथकातील इतर अंमलदारानी व्यास झडप घालुन जागीच पकडले व त्याच्या कमरेला लावलेले आणि कापडी पिशवीतील असे दोन परदेशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे असा एकुण 02 लाख 10 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी सुनिल लक्ष्मीकांत अकोले, वय-30 रा. 43, न्यु सुनिल नगर एमआयडीसी सोलापूर यास अटक केली आहे.

सदरील आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्यावर एमआयडीसी, जेलरोड, जोडभावी पेठ पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी जबरी चोरी करत असताना दुखापत करणे तसेच घरफोडी सारखे विविध गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, पो.नि. शिवशंकर बोंदर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक विक्रम रजपुत, पोहेकॉ राकेश पाटील, नाना उबाळे, दिपक डोके, सचिन भांगे, पोना, मंगेश गायकवाड, पोकों, सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, दिपक नारायणकर, शैलेश स्वामी, अमोल यादव, अमर शिवसिंगवाले, आमसिध्द निंबाळ, देवीदास कदम, भारतसिंग तुक्कुवाले यांनी पार पाडली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका