प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांच्या “महिलांमधील कॅन्सर” व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला : रविवार, 1 ऑक्टोबर 2023 रोजी सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथे “महिलांमधील कर्करोग: कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर समाज मंदिरामध्ये व्याख्यान संपन्न झाले.
सदर व्याख्यानास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगोला महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व कॅन्सर संशोधक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख ग्रा. पं. सदस्या ज्योती सावंत यांनी करून दिली. डॉ. बनसोडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात स्त्रियांमधील विविध कर्करोग, त्यांची संभाव्य कारणे व कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असणारी जीवनशैली याबाबत विविध उदाहरणे देत अत्यंत सोप्या व प्रभावशाली पद्धतीने मार्गदर्शन केले.
सदर व्याख्याना मध्ये त्यांनी संतुलित आहार, शारीरिक व्यायाम यांची गरज, तंबाखू दारू, गुटखा, खैनी, पान मसाला आदी व्यसनांना प्रतिबंध, रजो निवृत्तीनंतर होणारे संप्रेरक बदल व घ्यावयाची काळजी, लसीकरण याबाबत उपस्थित महिलांना अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
अंतिम टप्प्यात महिलांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. याप्रसंगी, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, माजी नगरसेवक किशोर बनसोडे व आबासाहेब शेजाळ सर यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रमुख संयोजिका म्हणून ज्योती सावंत व अश्विनी सावंत यांनी जबाबदारी पार पाडली. सदर व्याख्यानास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रथम फाऊंडेशनचीही उपस्थितांना दिली माहिती
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी प्रथम फाऊंडेशनच्या विविध कोर्सेसची उपस्थितांना माहिती दिली. ते म्हणाले की, सांगोला तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, आशाताई, अंगणवाडी सेविका, बचत गटाची सदस्य, व नोकरदार वर्ग आपल्या गावातील काही बेरोजगार युवक युवतीसाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने सर्व कोर्सेस ऍडमिशन चालू आहे. जर आपल्या गावामध्ये कोणी बेरोजगार युवक युवती असेल तर त्यांना या कोर्स बद्दल माहिती सांगा. जेणेकरून त्यांना या कोर्सची संधी मिळेल व 100% नोकरीची संधी मिळेल.
तुमच्या एका छोट्याशा मदतीने काही मुलांना करिअर करण्याची संधी मिळेल. नोकरी नंतर व्यवसाय करण्याची संधी मिळेल.
१) इलेक्ट्रिकल
२) टू व्हीलर मेकॅनिकल
३) फोर व्हीलर मेकॅनिकल
४) नर्सिंग ( GDA )
५) हॉटेल मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी
६) प्लंबिंग
७) कन्ट्रक्शन
८) वेल्डिंग
९) ब्युटी पार्लर असे कोर्सेस सुरू आहेत.
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याना राहण्याची व जेवणाची सोय आहे. 9421041433 या क्रमांकावर संपर्क साधावा. सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.