जवळ्यातील निहाल नदाफ यांचे निधन
जवळा : प्रतिनिधी
जवळा गावातील निहाल दस्तगीर नदाफ (वय ३२) यांचे दुःखद निधन झाले. अत्यंत कमी वयात त्यांनी रुग्णसेवा आणि सामाजिक कार्यातून ठसा उमटवला होता. निहाल यांच्या निधनाने जवळा गावावर शोककळा पसरली आहे. अल्पशा आजाराने रात्री आठ वाजता निधन झाले आहे.
निहाल नदाफ यांच्या पश्चात आई, बहीण, भाऊ, आज्जी असा परिवार आहे.
धडाडीचा रुग्णसेवक
निहाल नदाफ यांनी रुग्णसेवा करून मोठे नाव कमावले होते. जवळा गावात कोणाही रुग्णाला रात्री अपरात्री वैद्यकीय मदत लागली तर निहाल नदाफ हे धावून जात असत. धार्मिक कार्यातही ते अग्रभागी होते. हजरत टिपू सुलतान ग्रुपमध्ये ते सक्रिय होते. कोणत्याही धार्मिक कार्यात ते हिरीरीने सहभागी होत असत.
कोरोना काळात रुग्णांना मदत
निहाल नदाफ यांनी कोरोना काळात रुग्णांना मोठी मदत केली. रुग्णांना कोविड सेंटरपर्यंत पोहोचविण्यात त्यांची मोलाची मदत होत होती.
जवळा गावात दरवर्षी माजी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त २८ मार्च रोजी आयोजित करण्यात नेणाऱ्या आरोग्य शिबिरात निहाल नदाफ हे सक्रियपणे काम करत असत. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळावा याचा प्रयत्न करत असत.
राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील तसेच नामदार धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते.
निहाल नदाफ यांच्या निधनाने जवळा गावावर शोककळा पसरली आहे. एक उमदा आणि सामाजिक भान असलेला तरुण गेल्याने अनेकांना दुःख झाले आहे.
थिंक टँक न्यूज नेटवर्ककडून निहाल नदाफ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!👏🌻