“झिरवळ गेला झुरळ हुडकायला.. संजय राऊत चालला गुवाहाटीच्या झाडात बसायला”
शहाजीबापूंचा संजय राऊतांना हाबडा
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाच्या अगोदर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..” असे ट्विट केले होते. मात्र, सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर राऊत यांच्या ट्विटला शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) यांनी उत्तर दिले आहे.
सांगोला (नाना हालंगडे) : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. यानंतर शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. (Shahaji Patil’s reaction after the Supreme Court verdict)
“काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ.. काय नरहरी झिरवळ. झिरवळ गेला झुरळ हुडकायला.. संजय राऊत चालला गुवाहाटीच्या झाडात बसायला” असे म्हणत संजय राऊतांना सगळ्या पक्षांनी हाकलायला हवे. असे न झाल्यास उद्धव ठाकरे यांचा उरलेला पक्षही संपून जाईल अशी जोरदार टीका शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाच्या अगोदर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..” असे ट्विट केले होते. मात्र, सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर राऊत यांच्या ट्विटला शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) यांनी उत्तर दिले आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, संजय राऊत यांना हाणायला हुडकायला लागलाय झिरवळ..’ असा टोमणा त्यांनी लगावला आहे.
कोर्टाने लोकशाही टिकवाण्याचे काम केले त्याबद्दल कोर्टाचे आभार मानतो, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने केवळ सरकारच नव्हे तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या घश्यात जाण्यापासून वाचवली, असे शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू पाटील यांनी म्हटले. आता संजय राऊतांनी गुवाहाटीच्या जंगलात जावे आणि नरहरी झिरवळ यांनी झुरळ पकडायला जावे असा खोचक टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.
यासंदर्भात आमदार शहाजी पाटील म्हणाले की, आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीला ताकद देणारा असा आहे. विधिमंडळाचे पावित्र्य आणि विधिमंडळाचे अधिकार शाबूत ठेवणाराच हा निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशाला विधिमंडळाबाबत दाखवलेली दिशा अतिशय महत्त्वाची आहे. हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता; तर संपूर्ण देशातील विधिमंडळाचे अधिकार काय याबाबतचा हा निर्णय होता.
आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जरी काय लहान-मोठ्या गोष्टी चुकलेल्या असल्या तरी शिंदे-फडणवीस सरकार स्थिर राहण्याचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. महाराष्ट्राला अस्थिरतेतून न्यायालयाच्या निकालाने वाचवले आहे. आगामी निवडणुकीपर्यंत हे शिंदे-फडणवीस सरकार स्थिर राहणार आहे. राहिलेल्या सत्ता काळात महाराष्ट्राच्या जनतेसाठी योग्य व निर्णायक निर्णय घेतले जातील. आगामी २०२४ ची निवडणूकही शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवून आम्ही मोठ्या बहुमताने जिंकून दाखवू, असा विश्वास असल्याचेही आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.
संजय राऊतांना सगळ्या पक्षांनी हाकलायला हवे. असे न झाल्यास उद्धव ठाकरे यांचा उरलेला पक्षही संपून जाईल अशी जोरदार टीका शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा