समलैंगिक मित्राच्या घरी गेला आणि गेम झाला
महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी
थिंक टँक न्यूज नेटवर्क
तो बँकेचा वसुली अधिकारी होता. मात्र त्याला एक “नाद” होता. तो एका गे ग्रुपच्या संपर्कात आला आणि तिथेच एकाची ओळख झाली. ओळखीतून “त्याच्या” घरी येणे जाणे वाढले. इथवर ठीक होते… मात्र, गे असलेल्या मित्राच्या बायकोवर याची नजर गेली तिथेच त्याचा घात झाला.
वाचा महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी…
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण जालना जिल्ह्यात समोर आलेले आहे. बाजार समितीच्या आवारामध्ये काही दिवसांपूर्वी चाळीस वर्षीय प्रदीप भाऊराव कायंदे (रा. उंबरखेड, ता. देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.
बँकेचे वसुली अधिकारी म्हणून काम करत असलेल्या या व्यक्तीचा कुणी खून केला? याची परिसरात जोरदार चर्चा होती. मात्र मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आणि अखेर विवाहबाह्य समलैंगिक संबंधातून हा प्रकार झाल्याचे समोर आलेले आहे.
बँकेचे वसुली अधिकारी म्हणून काम करत असलेल्या या व्यक्तीचा कुणी खून केला? याची परिसरात जोरदार चर्चा होती. मात्र मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आणि अखेर विवाहबाह्य समलैंगिक संबंधातून हा प्रकार झाल्याचे समोर आलेले आहे.
प्रदीप कायंदे हा गेल्या काही दिवसांपासून एका गे ग्रुपच्या संपर्कात आलेला होता. एका ॲपच्या माध्यमातून त्याची आरोपीसोबत ओळख झालेली होती. प्रदीप यांच्या नोकरीचे ठिकाण जालना होते त्यामुळे तो जालन्यावरून ये जा करत असायचा आणि जेव्हा कधी त्याला लहर आली की तो त्याचा परिसरातील समलैंगिक असलेला मित्र सोपान सदाशिव बोराडे यांच्या मंठा येथील शांतीनगर परिसरात असलेल्या घरी जात असायचा. गेल्यात दोन वर्षांपासून त्याचा हा प्रकार सुरू होता.
सोपान बोराडे यांच्या घरी गेल्यानंतर सर्वप्रथम तो सोपान याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचा आणि त्यानंतर सोपानच्या पत्नीसोबत देखील तो शारीरिक संबंध ठेवत असायचा. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा हा नित्यक्रम बनलेला होता.
मारहाणीत जागीच मृत्यू
7 एप्रिल रोजी प्रदीप कायंदे हा नेहमीप्रमाणे सोपान याच्या घरी गेला. सर्व काही झाल्यानंतर सोपान बोराडे आणि प्रदीप कायंदे यांच्यात वाद झाला आणि सोपान बोराडे याने तात्काळ त्याच्या काही मित्रांना बोलावून प्रदीप याला बेदम मारहाण केली त्यानंतर तो जागेवरच मयत झालेला होता.
सोपान बोराडे याने त्याचा भाऊ प्रकाश बोराडे यांच्या मदतीने मृतदेह उचलला आणि मंठा बाजार समितीच्या आवारात घेऊन फेकून दिला.
व्हिडिओ कॉल मिळाले
पोलिसांच्या ताब्यात काही व्हिडिओ कॉल, फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आलेले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोपान बोराडे आणि त्याचा भाऊ प्रकाश बोराडे यांना अटक करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणात इतरही काही आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत असून अवघ्या काही दिवसांच्या आत मुख्य आरोपींना जेरबंद केल्याचे वृत्त मराठी बातमी या न्यूज पोर्टलने प्रसिद्ध केले आहे.
हेही वाचा