सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा
माजी नगरसेवक आनंदा माने यांचे आवाहन
सांगोला / प्रतिनिधी
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली असून यामध्ये शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस (आय), भाजप, आनंदा माने गट यांची आघाडी झाली असून या सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा माने यांनी केले.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान याठिकाणी भीमनगर येथील व्यापारी गटातील मतदारांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी आनंदा माने यांनी व्यापारी गटातील अमजद बागवान व राम बाबर या दोन्ही उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.
तसेच यावेळी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन इंजि. रमेश जाधव, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, राष्ट्रवादीचे चंचल बनसोडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तर मतदारांच्या वतीने सतीश बनसोडे यांनी सर्व मते अमजद बागवान व राम बाबर यांनाच देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी माजी संचालक सचिन फुले, विष्णूपंत केदार, काशीलिंग गावडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन सावंत, अमोल बनसोडे, नाथा बनसोडे, दारासिंग ढावरे, नरेश बनसोडे, आकाश आठवले, जय बनसोडे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.