
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील जवळा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे झोपडीत झोळीत झोपलेल्या एका दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. वावटळीने ही झोळी तब्बल 400 फूट हवेत उडाली आणि दूरवर जाऊन पडली. या झोळीत झोपलेल्या या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जवळा व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
जवळा येथील वडिलांकडे दवाखान्याला आलेल्या लेकीच्या दोन वर्षाच्या मुलीचा सोसाट्याच्या वाऱ्याच्या वावटळीने चारशे फूट लांब उरून,जावून दगडावर आदळून मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजनेच्या सुमारास घडलेली आहे.
सोनंद येथील साधू चव्हाण यांची दोन वर्षाची कन्या कस्तुरी साधू चव्हाण असे मृत्यू झाला झालेल्या बालिकेचे नाव आहे. साधू चव्हाण यांची सासुरवाडी जवळा आहे. त्यांच्या पत्नी आपल्या कन्येला दवाखान्याला घेवून जवळा येथे आल्या होत्या. आज गुरुवार दुपारी अडीच वाजनेच्या सुमारास दवाखाना करून त्यांनी मुलीला पालातील साडीच्या झोपाळ्यात झोपविले होते.
दरम्यान अचानकच वातावरण बदलल्याने पालातील झोपाळा चारशे फूट उंच उडाला. अन् त्यानंतर ही मुलगी दगडावर आदळली. त्यातच तिचा जागेवर मृत्यू झाला. ही सदरची घटना जवळा गावातील जवळा-घेरडी रोडलगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ घडलेली आहे.
मरीआई गाडीवाले कुटुंबियातील ही लहानशी मुलगी आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने ही दुर्घटना घडलेली आहे. याबाबत महसूल यंत्रणेनी पंचनामा केला आहे. सांगोला पोलीसातही याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले
कुटुंबातील सर्वांची लाडकी असलेली कस्तुरी ही दुपारी जेवण करून झोपडीत असलेल्या झोळीत झोपली होती. बाहेर कडाक्याचे उन्ह होते. अंगाची लाहीलाही होत होती. मात्र झोपडीच्या सावलीत ही चिमुरडी झोपी गेली. काही वेळातच जोरात वावटळ आली. या वावटळीने ही मुलगी चारशे फूट लांब उडून जावून दगडावर जावून आदळली. या घटनेत तिचा मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजनेच्या सुमारास घडलेली आहे.
ही घटना घडल्याचे समजताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तिचा मृतदेह पाहून महिलांनी हंबरडा फोडला. दरवर्षी मे महिन्यात मोठा वारा सुटत असतो. आज मात्र भर दुपारी मोठा वारा सुटला होता. काही वेळातच जोरात वावटळ आली. या वावटळीने ही मुलगी चारशे फूट लांब उडून जावून दगडावर जावून आदळली. घरातील सर्व लोक तिच्याकडे धावले. मात्र, ही चिमुरडी जोरात दगडावर आदळली असल्याने तिच्या डोक्याला जोराचा मार लागला. यात तिचा मृत्यू झाला. या घटनेने जवळा तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा