शाश्वत विकासासाठी ऐतिहासिक वारसा जतन करणे काळाची गरज : डॉ.श्रीकांत गणवीर
सांगोला महाविद्यालयात इतिहास विभागाचे राष्ट्रीय चर्चासत्र
सांगोला/प्रतिनिधी
बदल हा निसर्गाचा नियम आहे, आपल्या देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा आपणाला काळाच्या ओघात विसर पडत आहे हे स्पष्ट करून कोणत्याही व्यक्तीच्या आणि संस्कृतीच्या अभिव्यक्तीच्या खुणा ह्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा मध्ये दिसतात. किल्ले,मंदिरे,लेणी आणि ऐतिहासिक स्थळांच्या मधून ज्ञानाची गंगा परंपरेने पुढे चालत आली आहे, या ऐतिहासिक वारशामुळेच भारतीय संस्कृतीचे जतन झाले, यातूनच विकासाची बीजे रुजली गेली आपल्या देशाचा शास्वत विकास करायचा असेल तर ऐतिहासिक वारशा जतन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे येथील डेक्कन अभिमत विद्यापीठाचे प्रा.डॉ.श्रीकांत गणवीर यांनी केले.
येथील सांगोला महाविद्यालयाचा इतिहास विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने जागतिक वारसा सप्ताहानिमित्त ‘वारसा आणि शास्वत विकास’ या विषयावर आयोजित एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून ते बोलत होते.चर्चासत्राचे अध्यक्ष स्थान सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.बाबुरावजी गायकवाड यांनी भूषविले.
यावेळी सचिव म.सि.झिरपे ,सदस्य सु.ग.फुले,सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहने, डॉ.माया पाटील, डॉ.रवींद्र चिंचोलकर, डॉ.प्रभाकर कोळेकर ,डॉ विराग सोनटक्के(बनारस), डॉ.चंद्रकांत चव्हाण, डॉ.रविकिरण जाधव, डॉ.संजय गायकवाड, डॉ.किशोर जोगदंड, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले,इनामगावचे सरपंच तुकाराम मचाले आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बाबुराव गायकवाड म्हणाले,प्रत्येक व्यक्तीने आपल्या भागातील ऐतिहासिक घटना मंदिरे व स्थळे यांची माहिती समजून घेतली तर आपला वारसा जतन होईल.हा वारसा पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.
ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा : सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहने
आपल्या देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून सांगोल्या सारख्या ग्रामीण भागात वारसा आणि शाश्वत विकास या विषयावर सांगोला महाविद्यालयाच्या सहकार्याने राष्ट्रीय चर्चासत्र होत आहे. यामुळे विद्यार्थी आणि संशोधकांमध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाविषयी जनजागृती होईल. विकास कामे करत असताना शासनला काही वेळा ऐतिहासिक वारसा स्थळांचा अडथळा येतो.
अशा वेळी विकास कामा बरोबरच लोकभावना ही महत्वाची असते. त्या ऐतिहासिक स्थळाचे जतन करून विकास कामाचा विचार करावा लागतो.एक प्रशासक म्हणून समन्वयाची भूमिका घेत असताना लोकांचा सहभाग ही महत्वाचा ठरतो.याचाच अर्थ ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करताना लोकसहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहने यांनी ‘वारसा जतन आणि संवर्धनामध्ये शासनाची भूमिका’ याविषयी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.
या चर्चासत्रामध्ये मंदिर स्थापत्य आणि वारसा याविषयावर आपली मांडणी करताना डॉ.माया पाटील म्हणाल्या आपल्या देशात मंदिर हे एक सामाजिक संस्था मानली जाते.ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन करण्यासाठी मंदिरे जतन होणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
धर्माचरण आणि मनोरंजन यासाठी लोककला महत्वाच्या आहेत लोककला मधून वारसा जतन होतो हे स्पष्ट करून वारसा संवर्धनात प्रसार माध्यमाची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन डॉ.रवींद्र चिंचोलकर यांनी केले.
या चर्चासत्रात सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटन या विषयी डॉ.प्रभाकर कोळेकर यांनी मार्गदर्शन केले.महाराष्ट्रातील उत्खननातून प्राप्त बौद्ध वारसा या विषयी डॉ.विराग सोनटक्के यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.पी.सी.झपके यांनी भूषविले.
प्रास्ताविकामध्ये समन्वयक डॉ.सदाशिव देवकर यांनी चर्चासत्र अयोजानामागाची भूमिका स्पष्ट केली.आभार सह्समन्व्यक डॉ.महेश घाडगे मानले.सूत्रसंचालन प्रा.संतोष कांबळे, प्रा.विशाल कुलकर्णी यांनी केले.
चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले,सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहने यांचे मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ.सदाशिव देवकर ,डॉ.महेश घाडगे ,डॉ.राम पवार,पुरातव विभागाचे संजय चिटटमवार, अधिक्षक प्रकाश शिंदे, प्रा.राजकुमार महिमकर ,प्रा.शामराव नवले,प्रा.संतोष लोंढे, प्रा.मालोजी जगताप, डॉ.मच्छिंद्र वेदपाठक,डॉ.जमीर तांबोळी,प्रा.ओंकार घाडगे,प्रा.विकास उबाळे,प्रा.भाग्यश्री पाटील,प्रा.सोनल भुंजे,प्रा.प्रज्ञा काटे, प्रा. प्रशांत गोडसे, श्री. सतीश माने, सिद्धेश्वर स्वामी यांचेसह प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.चर्चासत्रामध्ये शंभर हून अधिक प्राध्यापक ,संशोधक व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.
फोटो ओळ – सांगोला येथील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना बिजभाषक डॉ.श्रीकांत गणवीर , श्री.बाबुरावजी गायकवाड, डॉ.विलास वाहने, म.सि.झिरपे ,सु.ग.फुले, डॉ.सुरेश भोसले, डॉ.चव्हाण, डॉ.पवार,डॉ.देवकर