ताजे अपडेट

गौतमी पाटील येतेय घेरडीत

सांगोलेकरांसाठी गुड न्यूज

Spread the love

“सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम” या गाण्यावरील डान्समुळे तिचे लाखो चाहते निर्माण झाले आहेत. लावणी नर्तिका गौतमी पाटील सांगोला तालुक्यातील घेरडी गावात येत आहे. तिचा कार्यक्रम निश्चित झाला असून घेरडी गावात जंगी तयारी करण्यात येत आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
आपल्या मादक अदांनी तरण्या पोरांना घायाळ करणारी लावणी नर्तिका गौतमी पाटील सांगोला तालुक्यातील घेरडी गावात येत आहे. तिचा कार्यक्रम निश्चित झाला असून घेरडी गावात जंगी तयारी करण्यात येत आहे. “सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम” या गाण्यावरील डान्समुळे तिचे लाखो चाहते निर्माण झाले आहेत.

१९ मे रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सोमाआबा मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त घेरडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगोला तालुक्यातील महुद येथे यापूर्वी गौतमी पाटील हीचे कार्यक्रम झाले आहेत. मात्र जवळा, घेरडी भागात गौतमी पाटील हीचा कार्यक्रम प्रथमच होत आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांचे अत्यंत जवळचे, विश्वासू सहकारी म्हणून सोमाआबा मोटे हे प्रसिद्ध आहेत. मोटे यांनी घेरडी भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. तरुणांत त्यांनी मोठे संघटन उभा केले आहे.

कोण आहे गौतमी पाटील?
गौतमी पाटीलचा जन्म 1996 मध्ये शिंदखेडा, धुळे महाराष्ट्र, भारत येथे झाला. आता ती 27 वर्षांची आहे. गौतमी पाटील ही खानदेश म्हणजे धुळे मधील शिंदखेडा या गावची मूळची आहे. तिच्या वडिलांचे गाव चोपळा हे आहे. शिंदखेडा हे तिच्या आईचे गाव आहे. गौतमीचे वडील तिला लहान असतानाच काही कारणास्तव सोडून गेले. गौतमी लहानाची मोठी तिच्या मामाकडेच झाली. गौतमी इयत्ता आठवीमध्ये असतानाच पुण्यामध्ये आली होती. शिक्षणामध्ये तिला एवढा रस नव्हता घरच्या परिस्थितीमुळे तिने नृत्याकडे वळण्याचा निर्णय घेतला.

गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि अतिशय वादग्रस्त डान्सर बनली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये गौतमी पाटील एका शोमध्ये आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या तेव्हा तिने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले. डान्सर गौतमी पाटीलने लावणी ड्रेस वेगळ्या पद्धतीने परिधान करून अश्लील आणि वादग्रस्त डान्स केला. अनेक लोकांनी गौतमी पाटीलला तिच्या डान्स स्टेप मुळे ट्रोल करायला सुरुवात केली.

सर्वप्रथम गौतमीने बॅक डान्सर म्हणून काम केले. गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती नृत्यात काही अनपेक्षित डान्स स्टेप्स दाखवत होती. तिचा हा डान्स अश्लिल असल्याचा अनेकांनी आरोप केला. तिच्या अश्लील नृत्यासाठी लोकांनी तिला ट्रोल केले.

ट्रोलिंगमुळे प्रसिद्धीच्या झोतात
गौतमी पाटील इंस्टाग्राम रिल्स आणि विविध डान्स क्लिप्स व्दारे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. अकलूज लावणी महोत्सवमध्ये गौतमी पाहिले बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. यामध्ये तिला 500 ते 1000 रुपये एवढे मानधन मिळत होते.

गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि अतिशय वादग्रस्त डान्सर बनली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये गौतमी पाटील एका शोमध्ये आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या तेव्हा तिने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले. डान्सर गौतमी पाटीलने लावणी ड्रेस वेगळ्या पद्धतीने परिधान करून अश्लील आणि वादग्रस्त डान्स केला. अनेक लोकांनी गौतमी पाटीलला तिच्या डान्स स्टेप मुळे ट्रोल करायला सुरुवात केली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका