ताजे अपडेट

आरटीओवर “स्मार्ट” संकट, १४ हजार लायसन्स प्रलंबित

अधिकारी म्हणतात, वाहतूक पोलिसांना पावती दाखवा

Spread the love

कार्यालयाकडून स्मार्ट कार्ड देण्यास २००७ पासून सुरुवात झाली. नियमितपणे ५०० वाहन परवाने छापून दिले जातात. आरटीओच्या ऑनलाइन सुविधांमुळे अनेक जण घरात बसून शिकाऊ परवाने काढत आहेत. परंतु सहा महिन्यांनंतर कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर त्यांना ऑपाईमेंट मिळते पण परीक्षा दिल्यानंतर परवाना मिळवताना अडचणींचा सामाना करावा लागतो आहे. परिवहन विभागाने दोन कंपन्यांना कार्ड पुरवण्याचा ठेका दिला आहे. त्या कार्डवर बसवण्यात येणाऱ्या चिप उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

सोलापूर : उपप्रादेशिक परिवहन विभागात वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी लागणाऱ्या स्मार्ट कार्डचा तुटवडा आहे. त्यामुळे १४ हजार जणांचे वाहन परवाने प्रलंबित आहेत. ही स्थिती तीन महिन्यांपासून आहे. वाहतूक पोलिसांनी विचारणा केल्यास चालकांनी अर्ज केल्याची पावती दाखवावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. (The Regional Transport Office (RTO) is a government organization established to oversee all transport-related operations in India. It exists in every state and Union Territory. RTO is responsible for carrying out the functions and activities of the Motor Vehicles Act, of 1988. )

“स्मार्ट कार्डचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नाही. मागील तीन महिन्यांपासून तुटवडा आहे. स्मार्ट कार्डचा तुटवडा असल्याचे कमिशनर कार्यालयास कळवले आहे. पोलिसांनी चालकाकडे पावती पाहून शहानिशा करावी आणि कार्यवाही करावी. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

कार्यालयाकडून स्मार्ट कार्ड देण्यास २००७ पासून सुरुवात झाली. नियमितपणे ५०० वाहन परवाने छापून दिले जातात. आरटीओच्या ऑनलाइन सुविधांमुळे अनेक जण घरात बसून शिकाऊ परवाने काढत आहेत. परंतु सहा महिन्यांनंतर कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर त्यांना ऑपाईमेंट मिळते पण परीक्षा दिल्यानंतर परवाना मिळवताना अडचणींचा सामाना करावा लागतो आहे. परिवहन विभागाने दोन कंपन्यांना कार्ड पुरवण्याचा ठेका दिला आहे. त्या कार्डवर बसवण्यात येणाऱ्या चिप उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. ही स्थिती राज्यभर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“स्मार्ट कार्डचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नाही. मागील तीन महिन्यांपासून तुटवडा आहे. स्मार्ट कार्डचा तुटवडा असल्याचे कमिशनर कार्यालयास कळवले आहे. पोलिसांनी चालकाकडे पावती पाहून शहानिशा करावी आणि कार्यवाही करावी. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

हेही वाचा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका