शेतीवाडी

सांगोल्यात 40 हजार हेक्टरवर खरीप हंगाम साधणार

Spread the love

पीकपाणी वार्तापत्र/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. तालुक्याचे सरासरी २२ हजार ७१९ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. सन २०२३ च्या खरिप हंगामामध्ये ४० हजार ३२५ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. खरिप हंगामासंदर्भातील पेरणी, बियाणे व खतांचे संपूर्ण नियोजन कृषि विभागाने केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी थिंक टँक न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली.

तालुक्यात सध्या उन्हाळी मशागतीची कामे सुरू आहेत. शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, फणाटणी कामांबरोबरच शेणखत विस्कटण्याची कामे सुरू आहेत. तालुक्यात सरासरी खरिप क्षेत्र २२ हजार ७१९ हेक्टर आहे. सन २०२१ खरिप मध्ये २९ हजार ८४८ हेक्टर क्षेत्रावर व गतवर्षी सन २०२२ मध्ये ३१ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती.

येणाऱ्या २०२३ च्या खरिप हंगामामध्ये ४० हजार ३२५ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. तालुक्यासाठी यावर्षी खरिपासाठी १५ हजार ८२६ मे. टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर झाले आहे. या हंगामासाठी येणाऱ्या अडचणी व खतांचे नियोजन कृषि विभागाने केले आहे.

गेल्या वर्षी युरिया खताचा काही प्रमाणात तुटवडा जाणवला होता. यावर्षी खतांचे संपूर्णपणे सूक्ष्म नियोजन केले आहे. गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापणा करण्यात आली आहे. तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण कक्षही स्थापण करण्यात आला आहे. .

शेतकऱ्यांनी आधिकृत दुकाणदाराकडुनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावेत. दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे. बॕगवरिल किंमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये. बियाणे बॕग व लेबल जपून ठेवावे. शेतकऱ्यांनी बिजप्रक्रिया करूनच बियाणाची पेरणी करावी. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यवरच म्हणजे ८० – १०० मिमी पाऊस झाल्यवरच पेरणी करावी. बियाणे, खते, किटकनाशके बाबत काही अडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

खतनिहाय मंजूर आवंटन पुढीलप्रमाणे –
खताचे नाव – आवंटण
युरिया – ५,९४७ मे. टन
एस.एस.पी. – २,१४६ मे. टन
एम.ओ.पी. – ९९९ मे. टन
डि.ए.पी. – १,७५७ मे. टन
एन.पि.के. – ४,९७७ मे. टन

* खरिप हंगामातील पिकनिहाय पेरणी चित्र –
पिकाचे नाव – सरासरी हेक्टर क्षेत्र – खरीप २०२२ चे क्षेत्र (हे.) – २०२३ चे प्रस्ताविक क्षेत्र (हे) –
बाजरी – १५५९६.६ – ११०१६.४ – १५०००
मका – ३९०१.६ – १४२५६ – १७५००
सुर्यफुल – ३८३.८ – ४०८० – ४२५०
तुर – २५७२.२ – ९८३.१ – १२५०
उडिद – ९४ – ४०३.९ – ६००
मुग – ८५.६ – १९१.८ – ४००
भुईमुग – १५४.८ – ४१२.७ – ५००
सोयाबिन – ०.६ – २३०.८ – ३००
कापुस – ०.२ – २६४.४ – ४००
मटकी – ० – ११२.७ – १२५
एकूण – २२७१९.२ – ३१९५२.८ – ४०३२५.

तालुका कृषी विभागाने यावर्षी खरिपाचे संपूर्ण तयारी केली आहे. यामध्ये औषधे, बियाणे, खते यांचा तुटवडा होऊ नये याची काळजी घेतली आहे. शेतकऱ्यांनी आधिकृत दुकानदाराकडुनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावेत. किमतीपेक्षा कोणीही खते औषधांना जास्त पैसे देऊ नये. बियाणे, खते, किटकनाशके बाबत काही अडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा – शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका