डिकसळचे प्रा.रानोबा करांडे यांचे निधन
सांगोला/ प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील रहिवाशी तसेच डिकसळ आश्रमशाळेचे सचिव प्रा.रानोबा ज्ञानू करांडे यांचे रविवार 9 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सांगली येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. निधनासयमी त्यांचे वय 62 इतके होते.
प्रा.रानोबा करांडे हे डिकसळ गावातील लोणारी समाजातील थोर असे व्यक्तिमत्व होते. अत्यंत गरिबीच्या परिस्थीतीत त्यांनी प्राध्यापक पदापर्यंत मजल मारली होती. गेल्या दोनच वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. ते डिकसळ गावचे रहिवासी असले तरी, जत,पौट येथेही त्यांचा मित्रंमंडळींचा गोतावला मोठा होता.
प्रा.रानोबा करांडे यांच्या निधनाची बातमी कळताच डिकसळ गावावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रा.रानोबा करांडे यांना काल शनिवार रात्री 10 वाजता अटॅक आला होता. त्यानंतर त्यांना कालच रात्री सांगली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खूपच बिकट झाली होती. आज सायंकाळी साडे चार वाजनेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पार्थिवावर डिकसळ येथे रात्री 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांनी मागील वर्षभरापूर्विच गावात महालक्ष्मी नावाने पोल्ट्री फॉर्म सुरू केला होता. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेले प्रा. रानोबा करांडे यांच्या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सूना, जावई व नातवंडे असा परिवार होता. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी कार्यक्रम मंगळवार 11 एप्रिल रोजी होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकानी सांगितले.