सांगोल्यात हेलिकॉप्टर ओझ्याने बसले खाली
मंत्री विखे-पाटलांच्या दौऱ्यावेळची घटना

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
हेलिकॉप्टर म्हटले की त्यात बसणाऱ्या माणसांची मर्यादित संख्या विचारात घ्यावीच लागते. असे नाही झाले तर पचका होतो, हे निश्चित. असाच काहीसा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे घडला. तोही एका कॅबिनेट मंत्र्यांसमोर. हेलिकॉप्टरची सिटींग मर्यादा सहा मात्र बसले आठ… मग पुढे जे झाले ते वाचून तुम्हीही चकित व्हाल!
त्याचे झाले असे, राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आज शनिवारी सांगोला येथील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्यासह इतर राजकीय मंडळी उपस्थित होती.
राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनासाठी आलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्यामुळे हेलिकॉप्टर काही केल्याने उड्डाण घेईना. पायलटच्या १० ते १५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर अखेर हेलिकॉप्टरमधून महिला अधिकारी उतरल्या आणि हेलिकॉप्टरने दुपारी ३ च्या सुमारास आकाशात उड्डाण घेताच पायलट सह पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवात जीव आला. हा प्रकार आज शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास सांगोला महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर घडला.
राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज शनिवारी सांगोला येथील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर त्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्या निवासस्थानी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते विरोधी पक्षाच्या नेते मंडळीची निवेदने स्वीकारली. भोजनानंतर ते परत मुंबईला जाण्यासाठी सांगोला महाविद्यालयाच्या हेलीपॅड वर गेले.
ठिकाणी हेलिकॉप्टरमध्ये पायलट, को पायलट, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अंगरक्षक यांच्यासह ८ लोक बसले होते. परंतु हेलिकॉप्टर काही केल्याने उड्डाण घेईना, पंख्याची पाते वेगाने फिरत असल्यामुळे हेलिपॅड वर धुरळा उडाल्याने कोणाच्या काहीच लक्षात येत नव्हते.
हा प्रकार सुमारे १० ते १५ मिनिटे चालू होता. अखेर मंत्री महोदयाच्या हेलिकॉप्टरमधून महिला अधिकारी खाली उतरल्या. दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी हेलिकॉप्टर आकाशात झेपावले , तेव्हा कोठे पोलीस अधिकारी यांच्यासह नेते मंडळीच्या जीवात जीव आला.
धुरळा उडाला पण हेलिकॉप्टर तिथेच
या हेलिकॉप्टरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह एकूण आठ लोक बसले होते. हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. हेलिकॉप्टरच्या परिघातील धुरळा मोठ्या प्रमाणात उडाला. त्यामुळे निरोप देण्यासाठी व हेलिकॉप्टर पाहण्यासाठी आलेल्या लोकांना वाटले आता हेलिकॉप्टर आकाशात गेले असेल.
मोकळे झालेल्या हेलिकॉप्टरने पुन्हा आकाशात उड्डाण घेतले. काही मिनिटातच हे हेलिकॉप्टर वाऱ्याच्या वेगाने आकाशात झपावले. मात्र या प्रकाराची चर्चा तिथे जमलेल्या लोकांमध्ये रंगली होती.
मात्र हे हेलिकॉप्टर सुमारे दहा मिनिटे त्याच धुरळ्यात अगदी कमी उंचीवर रेंगाळले होते. बराच वेळ झाले हेलिकॉप्टर वर जाईना कारण हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या लोकांची संख्या जास्त होती.
हे ओझे हेलिकॉप्टरला सोसवेना. परिणामी ते हवेत उंचावर जाऊ शकत नव्हते. बराच वेळ हा प्रकार त्या धुरळ्यात सुरू होता. कदाचित पायलेटने सांगितल्यानंतर आतील बसलेल्या लोकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा. काही वेळानंतर हेलिकॉप्टर पुन्हा जमिनीवर उतरले आणि यातून काही लोक खाली उतरले.
मोकळे झालेल्या हेलिकॉप्टरने पुन्हा आकाशात उड्डाण घेतले. काही मिनिटातच हे हेलिकॉप्टर वाऱ्याच्या वेगाने आकाशात झपावले. मात्र या प्रकाराची चर्चा तिथे जमलेल्या लोकांमध्ये रंगली होती.
या घटनेची सांगोला तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे. नेते वजनदार असतात. माणसांचे कर्तुत्वही वजनदार असते. मात्र, हेच वजन हेलिकॉप्टरवर पडले की हेलिकॉप्टरला ते वजन सोसवत नाही, याचाच प्रत्यय जणू सांगोला येथे घडलेल्या या घटनेतून आला.