गुन्हेगारी

सांगोल्यात पोलीस उपनिरीक्षकाचा निर्घृण खून

Spread the love

पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) हे वासूद ( ता.सांगोला ) जेवणानंतर रात्री घरापासून केदारवाडी रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असता बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचा अज्ञात मारेकरांकडून पाठीमागून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगोला तालुक्यातील वासुद या गावात ही घटना घडली आहे.

पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) हे वासूद (ता.सांगोला) असे खून झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे हे सांगोला तालुक्यातील जवळा गावाचे जावई आहेत. ते सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

ही घटना आज बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास वासुद ( ता. सांगोला) येथील केदारवाडी रोडवर उघडकीस आली.

पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) हे वासूद ( ता.सांगोला ) जेवणानंतर रात्री घरापासून केदारवाडी रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असता बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून डोक्यात वार करून खून केला . रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी आज सकाळी शोध घेतला असता वासूद- केदारवाडी रोडनजीक त्यांचा मृतदेह आढळून आला .

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत . त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला .

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका