ताजे अपडेट

आष्टा कासार येथे आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन

Spread the love

गेली अकरा वर्षे समिक्षा फाऊंडेशन विद्याथ्यांमध्ये शैक्षणिक आवड निर्माण व्हावी म्हणून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप आणि समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या नामवंताना समिक्षा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.

उस्मानाबाद : विशेष प्रतिनिधी
समिक्षा फाऊंडेशन, लुब्बिनी बुद्ध विहार ट्रस्ट, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व बुद्धत्व सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि संबोधी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील आष्टा कासार येथे भरवले जात आहे. कालकथित तुकाराम गोविंद गायकवाड यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त हे संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद लातूरचे जेष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे हे भूषविणार आहेत.

 

 

गेली अकरा वर्षे समिक्षा फाऊंडेशन विद्याथ्यांमध्ये शैक्षणिक आवड निर्माण व्हावी म्हणून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप आणि समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या नामवंताना समिक्षा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. समाज, साहित्य, धर्म आणि संस्कृती क्षेत्रातील घडामोडीचे पडसाद साहित्यात पडत असतात. नव्हे तर साहित्य समाजाचा आरसा समजला जातो. साहित्य विचार सामाजिक शेवटच्या तळपातळीवरील घटकापर्यंत पोहोचावे, साहित्य विचार रुजावा, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मूल्यावर आधारित संविधान मूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे.

आंबेडकर साहित्य संस्कृती संवर्धन, निर्मिती, दस्तऐवजीकरण व्हावे आणि विचार प्रबोधन व्हावे. नवी पिढी राष्ट्र घडवणारी निर्माण व्हावी यासाठी समिक्षा फाऊंडेशनचे मुख्य प्रवर्तक डॉ. डॉ.टी. गायकवाड यांच्या पुढाकाराने हे संमेलन संपन्न होत आहे.

या संमेलनाचे वैशिष्ट म्हणजे यासाठी कोणताही आर्थिक कोष नाही. राजकीय हस्तक्षेप नाही. कोणाचीही देणगी नाही. अशा अनोख्या साहित्य संमेलनाचे आयोजन पहिल्यांदाच होत आहे. आंबेडकरी साहित्य, आंबेडकरी उर्जा प्रेरणेचे व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व आणि विचारांचे साहित्य म्हणजे आंबेडकरी साहित्य अशी व्याख्या रुजू झाली आहे. आष्टा कासार येथे लुंबिनी बुद्ध विहार ट्रस्ट सन २००५ पासून आणि भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर वाचनालय १ ९९८ पासून या संस्था या परिसरात सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात सक्रीय आहेत.

समताधिष्ठित समाजरचना निर्माण करणे हा आंबेडकरवादी साहित्याचा तत्वभाव आहे. ज्यांना समता नाकारली, न्याय नाकारला गेला, त्यांना सहानुभूती नाकारली, तेव्हा वंचिताना, पददलितांना, अस्पृश्यांना मुक्ती मिळवून देणाऱ्या मुक्तीला आंबेडकरप्रणित कार्यकारण भाव समजणे, समता प्रस्थापित करणे, समाजाची पुनर्रचना करणे हे आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे उद्दीष्ट आहे.

हे साहित्य संमेलन दि . २० ऑगस्ट २०२३ रोजी आष्टा कासार येथे लुबिनी बुद्ध विहाराच्या प्रांगणात भरत आहे. या संमेलनाचे उद्घाटन मा. ग्रामविकास राज्यमंत्री बसवराज पाटील हे करणार आहेत. समिक्षा फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ लेखिका सुरेखा शहा, आंबेडकरी साहित्यिक व ज्येष्ठ कथाकार योगीराज वाघमारे व लोहारा तालुक्यातील पत्रकार निलकंठ कांबळे यांना या संमेलनात सन्मानीत करण्यात येणार आहे.

याचसोबत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण आणि प्रतिभा निकेतनचे सेवानिवृत्त शिक्षक आर.जी. गायकवाड यांचा सेवानिवृत्ती गौरव सत्कार करण्यात येणार आहे. संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. डी. टी. गायकवाड यांनी समस्त साहित्यप्रेमींना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका