गुन्हेगारी

बायकोला विहिरीत ढकलले, ती जीव वाचवताना पुन्हा बुडवले, दोघा पती-पत्नीचा करुण अंत

सांगोल्याला हादरविणारी बातमी

Spread the love

या वादातच सिद्धाराम याने त्याची पत्नी सोनालीला विहिरीत ढकलून दिले. यावेळी फिर्यादीने पळत जाऊन विहिरीत उडी मारून सोनालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस सदरच्या विवाहितेचा पती सिद्धाराम याने विहिरीत उडी मारली व आपल्या पत्नीचा पाय ओढून विहिरीतील पाण्यामध्ये नेले.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
नवरा-बायकोची भांडणे किती टोकाला जावू शकतात. सांगोला तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे. ज्या घटनेत दोघाही पती – पत्नीचा अंत झाला आहे. या घटनेने सांगोला तालुका हादरला आहे.

पती – पत्नीच्या झालेल्या वादात व दारूच्या नशेत पतीने पत्नीला विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत बडून पती – पत्नी मृत्युमुखी पडल्याची घटना मेटकरवाडी , घेरडी (ता. सांगोला ) येथे घडली आहे. या घटनेमध्ये सिद्धाराम सुभाष कारंडे (वय 28 ) व सोनाली सिद्धाराम कारंडे (वय 25 , रा. मेटकरवाडी, घेरडी ता. सांगोला) हे पती – पत्नी मृत्यूमुखी पडले आहेत.

मृत सिद्धाराम सुभाष कारंडे व सोनाली सिद्धाराम कारंडे

लक्ष्मण बाबू आलदर (रा. मेटकरवाडी , घेरडी (ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराशेजारी त्यांच्या मेहुण्याचा मुलगा सिद्धाराम सुभाष कारंडे हा त्याची पत्नी सोनाली, तीन मुली असे त्याची आजीसह राहत होता. सिद्धाराम यास दारू पिण्याचे व्यसन होते. 13 जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारावरून शेजारी राहणारी सोनाली कारंडे हे त्यांच्या शेतात गेलेली दिसली. त्यानंतर त्याच्या पाठीमागून सिद्धाराम हाही गेला. त्यावेळेस तो दारू पिलेला होता. पती – पत्नीमध्ये वाद चालू होता. थोड्या वेळाने फिर्यादीही त्यांच्या पाठीमागे गेला असता सिद्धाराम हा सोनाली हिला शेतातील विहिरी जवळच मारहाण करत होता.

या वादातच सिद्धाराम याने त्याची पत्नी सोनालीला विहिरीत ढकलून दिले. यावेळी फिर्यादीने पळत जाऊन विहिरीत उडी मारून सोनालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस सदरच्या विवाहितेचा पती सिद्धाराम याने विहिरीत उडी मारली व आपल्या पत्नीचा पाय ओढून विहिरीतील पाण्यामध्ये नेले.

फिर्यादीने आपला जीव वाचवण्यासाठी विहिरीच्या कडेवर आला. परंतु या वेळेमध्ये सिद्धाराम याने आपल्या पत्नीला पाण्यात बुडवले व स्वतःही बुडून दोघांचा मृत्यू झाला. विहिरीला पायऱ्या नसल्यामुळे फिर्यादीलाही वर येता येत नव्हते. सायंकाळी सातच्या सुमारास लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकल्यानंतर फिर्यादी लक्ष्मण आलदर यांनी विहिरीतून आवाज दिला. आवाजावरून लोकांनी फिर्यादीस व पती – पत्नीचे प्रेतं विहिरीबाहेर काढले. या घटनेची फिर्याद लक्ष्मण अलदर यांनी 14 जुलै रोजी सांगोला पोलिसात दिली आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका