थिंक टँक स्पेशलविज्ञान/तंत्रज्ञान
Trending

घेरडीचा “तो” तांदूळ प्लास्टिकसदृश तरीही पोषक आहारच!

अन्नभेसळ विभागाने केला मोठा खुलासा

Spread the love

सांगोला तालुक्यातील घेरडी येथे शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या तांदळात प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळल्याची घटना उघडकीस आली होती. या गावच्या सरपंच सुरेखा पुकळे यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. याचे वृत्त सर्वप्रथम “थिंक टँक”ने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच राज्यात खळबळ उडाली होती. प्रशासनाचे धाबे दणाणले होते. केवळ घेरडी येथेच नव्हे तर सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये असा तांदूळ असल्याचे सांगण्यात आले.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील घेरडी येथे काल शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या तांदळात प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळल्याने खळबळ उडाली होती. याबाबत अन्न आणि भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी “थिंक टँक”कडे खुलासा केला आहे. विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने बनविलेला हा तांदूळ फोर्टीफाईड तांदुळ असून अत्यंत उपयुक्त आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हा खुलासा करण्यात आला असला तरीही जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी हे उद्या गुरुवारी घेरडी तसेच तालुक्यातील विविध ठिकाणच्या शाळांना भेट देऊन वस्तुस्थिती पाहणार आहेत. या तांदळाचे पंचनामे करून खातरजमा करण्यात येणार आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. (plastic rice, Plastic rice side effects)

सांगोला तालुक्यातील घेरडी येथे शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या तांदळात प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळल्याची घटना उघडकीस आली होती. या गावच्या सरपंच सुरेखा पुकळे यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. याचे वृत्त सर्वप्रथम “थिंक टँक”ने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच राज्यात खळबळ उडाली होती. प्रशासनाचे धाबे दणाणले होते. केवळ घेरडी येथेच नव्हे तर सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये असा तांदूळ असल्याचे सांगण्यात आले.

तालुक्यात अनेक गावांमध्ये असा तांदूळ आढळल्याने “थिंक टँक”ने प्रसिद्ध केलेल्या या बातमीची मोठी चर्चा झाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी या घटनेच्या सखोल चौकशीची आदेश प्रशासनाला दिले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी काही शाळांना भेटू देवून या घटनेच्या चौकशीची मागणी केली होती.

राज्यात अनेक ठिकाणी संभ्रम
असाच प्लास्टिक सदृश्य तांदूळ राज्यातील अनेक गावांमध्ये आढळून आला होता. रत्नागिरी येथेही अशी घटना घडली होती. याबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक पत्रक जारी केले होते. त्यानुसार प्लास्टिक सारखा दिसणारा तांदूळ हा फोर्टीफाईड तांदूळ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे पत्र “थिंक टँक”च्या हाती लागले आहे.

फोर्टीफाईड तांदूळ असतो कसा?
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रक्रिया करण्यात आलेल्या फोर्टीफाईड तांदळाचे वजन हे नियमित तांदळापेक्षा कमी असते. त्यामुळे सदरचा तांदुळ पाण्यामध्ये वर तरंगतांना दिसून येतो.

राज्यामध्ये कोविड १९ च्या प्रादूर्भावामुळे शाळा बंद असल्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिजविलेल्या आहाराचा पुरवठा केला जात नाही. तथापि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेअंतर्गत दिलेला तांदुळ व आहार खर्च मर्यादेमध्ये डाळी व कडधान्य विद्यार्थ्यांना वितरीत केले जात आहे.

या योजनेअंतर्गत फोर्टीफाईड तांदुळ प्रथमच दिला जात असून हा तांदूळ विद्यार्थ्यांना / पालकांना वितरीत केला जात आहे. पुरवठा करण्यात आलेल्या तांदुळामध्ये काही प्रमाणात तांदुळ फोर्टीफाईड आहे. उक्त तांदुळ हा नियमित तांदुळापेक्षा थोडासा पिवळसर आहे. केंद्र शासनाकडून शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ पासून योजनेअंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ प्रथम पुरवठा केला जात आहे. पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदूळामध्ये फोर्टीफाईड तांदूळ व नियमित तांदुळ यांचे प्रमाण १ : १०० आहे. म्हणजेच पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये फोर्टीफाइंड तांदळाचे प्रमाण १ किलोमध्ये १० ग्रॅम प्रमाणात आहे.

Fortification is the process of adding Fortified Rice Kernels (FRK), containing FSSAI prescribed micronutrients (Iron, Folic Acid, Vitamin B12) to normal Rice (Custom Milled Rice) in the ratio of 1:100 (Mixing 1 Kg of FRK with 100 Kg custom milled rice).

विद्यार्थ्याच्या आहारामधील सूक्ष्म पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्याकरीता फोर्टीफाइंड तांदूळ देण्यात येत आहे. या तांदळामध्ये Iron folic acid and Vitamin A Vitamin B1 V2 B 6 या पोषक घटकांचा (Micronutrients) समावेश करुन फोर्टीफाईड तांदूळ बनविण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने हा तांदुळ अत्यंत उपयुक्त आहे, असे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रक्रीया करण्यात आलेल्या फोर्टीफाईड तांदळाचे वजन हे नियमित तांदळापेक्षा कमी असते. त्यामुळे सदरचा तांदुळ पाण्यामध्ये वर तरंगतांना दिसून येतो. त्यामुळे योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या तांदळापैकी काही तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजू घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजू घातल्यानंतर त्यापैकी काही तांदुळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यास गैरसमज करण्यात येऊ नये, असे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

याबाबत भारतीय अन्न महामंडळाकडून देखील रत्नागिरी जिल्हा परिषदेने अभिप्राय घेतला आहे. उक्त तांदूळ प्लास्टीकचा नसून फोर्टीफाईड तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. फोर्टीफाईड तांदूळ नियमित पध्दतीने शिजविण्यात यावा याकरीता कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपध्दती अवलबिवण्याची आवश्यकता नाही.

अन्न आणि भेसळ प्रतिबंधक विभागाने याचा अधिकृत खुलासा केला नसला तरी सांगोला तालुक्यातील या तांदळाची प्रत्यक्ष तपासणी करून त्याची चौकशी करण्याची गरज आहे. फोर्टीफाईड तांदूळ आहे म्हणून नित्कृष्ट तांदूळ विद्यार्थ्याना खाऊ घालने जोखमीचे आहे.

योजनेअंतर्गत उक्त तांदूळ प्रथमच पुरवठा करण्यात येत असल्याने शाळास्तरावर पुरवठा केलेल्या तांदूळाचे यादृच्छिक पध्दतीने एका शाळेमधुन नमुने संकलित करुन एनएबील प्रमाणित अथवा शासकीय प्रयोगशाळेकडून तपासून घेण्यात यावेत. याकरीता येणारा खर्च व्यवस्थापन सनियंत्रण व मूल्यमापन या अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीतून भागविण्यात यावा. योजने अंतर्गत पुरवठा करण्यात येणारा फोर्टीफाईड तांदूळ हा अधिक पोषकमूल्य असलेला गुणवत्तापुर्ण तांदूळ आहे, असे रत्नागिरी जिल्हा परिषदेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सांगोल्यातील संभ्रम दूर व्हावा
सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये आढळून येत असलेल्या या तांदळाबाबत संभ्रम आहे. हा तांदूळ फोर्टीफाईड तांदूळ आहे असे गृहीत धरले तरी या तांदळाला बुरशी लागल्याचे दिसून येते. तांदूळ पिवळसर रंगाचा आहे. नैसर्गिक तांदूळ चांगला दिसतो मात्र हा फोर्टीफाईड तांदूळ बाजूला काढला तर त्याचा दर्जा खूपच खराब दिसून येतो.

 

अन्न आणि भेसळ प्रतिबंधक विभागाने याचा अधिकृत खुलासा केला नसला तरी सांगोला तालुक्यातील या तांदळाची प्रत्यक्ष तपासणी करून त्याची चौकशी करण्याची गरज आहे. फोर्टीफाईड तांदूळ आहे म्हणून नित्कृष्ट तांदूळ विद्यार्थ्याना खाऊ घालने जोखमीचे आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सर्व शाळांमध्ये वितरीत करण्यात येत असलेल्या तांदळाचे नमुने तपासून सत्य स्पष्ट करण्याची गरज आहे.


हेही वाचा

सांगोल्यात राष्ट्रवादीत होणार भूकंप?

पोरींना झिंगाट करणारा डीजे अक्षय गेला कसा?

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका