राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार!
गुढी पाडव्याचे पंचांग वाचन Gudhi Padawa
स्पेशल रिपोर्ट/नाना हालंगडे
नववर्षाची सुरुवात आज गुढी पाडव्याला झाली असून, अनेक गावांमध्ये याच नववर्षाच्या निमित्ताने पंचाग वाचनही पार पडले. यामध्ये काही ठळक बाबी निदर्शनास आल्या. येणारे वर्ष हे आपल्या राज्यासाठी धोक्याचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे पाऊस कमी असून, हा पाऊस परिटाच्या घरी आहे. राज्यात मोठी राजकीय खेळी पहावयास मिळणार आहे. रोगराई मोठ्या प्रमाणात असणार आहे. धनधान्य आणि दूधदुभते यांचे प्रमाण कमी होणार आहे.
गुढीपाडवा सण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी गुढी उभारून याचे स्वागत केले जाते. याच दिवशी सर्रास सर्वच गावामध्ये ग्रामदैवतामध्ये पंचांगाचे वाचन केले जाते. यातून स्पष्ट होणाऱ्या गोष्टी या वर्षभर त्याप्रमाणे होत असतात. यावेळी कडुलिंबाच्या मोहराचा काढा करून तो सर्व मंडळींना वाटप केला जातो. अशी ही पंचांग वाचनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. याच पंचाग वाचनातून या स्पष्ट बाबी निदर्शनास आलेल्या आहेत.
गुढी पाडवा हा नववर्षातील पहिलाच सण आहे. आज यानिमित्त वाचन करण्यात आलेल्या पंचांगातील या ठळक बाबी.
विशेष म्हणजे पाऊस परिटाच्या घरी असल्यामुळे, पाऊस तुलनेत कमी पडणार आहे. जसा की कापड धुल्यानंतर ज्या प्रमाणे पिळली जातात तसा पाऊस पडेल असे पंचांग सांगते.
राजकीय उलथापालथ
सध्या राज्यात सुरु असलेल्या खेळीला पूर्ण विराम मिळणार असून मोठे परिवर्तन होणार आहे. मोठी राजकीय उलथापालथही काही दिवसातच पहावयास मिळणार आहे, असे पंचागातून अनुमान काढण्यात आले.
वायू नावाचा मेघ असल्याने सोसाट्याचे वारे सुटून संकटे उदभवनार आहे. धान्यांची, धनाची नासाडी होईल. घरांचे नुकसान होईल. यावर्षी ककोंट नावाचा नाग आहे. अल्पवृष्टी होवून लोक दुःखी होतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे, म्हणून जनावरांना आनंद होईल. रोगराई,चोर यापासून लोकाना त्रास होईल. रब्बीचा स्वामी शनी असल्याने पाऊस कमी पडून धान्य खूपच कमी प्रमाणात पिकेल.
रसांचा अधिपती मंगल असून, गूळ, तूप,मध कमी मिळेल. तसेच मनी, मोती ,सोने महाग होईल. मेघनिवास परिटाच्या घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले म्हणजे एकंदरीत पर्जन्यमान काहीअंशी चांगले आहे. यामुळे यावर्षी चार आढक म्हणजे पडणारा पाऊस यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर असा वर्षाव होणार आहे.
मोठी राजकीय उलथापालथ
आपल्या राज्यात येत्या काही दिवसात मोठी राजकीय खेळी पहावयास मिळणार आहे. सध्या असलेली खेळी, राजकीय वाटचाल जनतेला खूपच त्रासदायक ठरत आहे. महागाईही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वादळी वाऱ्यांचा अन् चोऱ्यांच्या मोठा त्रास ही जनतेला होणार आहे.
यंदाचा पाऊस परिटाच्या घरी असून हा पाऊस समाधानकारक पडणार नाही. रोहिणी नक्षत्र तटावर पडले असून, सहा भाग पाऊस नद्या अन् पर्वतावर चार भाग भूमीवर असा पाऊस पडणार आहे. विशेष कपडे पिळावेत त्याप्रमाणे हा पाऊस असणार आहे, असे पंचांग सांगते.
पंचाग वाचन महत्त्वाचे
ग्रामीण भागात पाढव्याच्या दिवशी ग्रामदैवतांच्या ठिकाणी हे पंचांग वाचन केले जाते. प्रारंभी कडू लिंबाच्या मोहराचा काढा करून तो सर्वांना वाटप केले जाते. त्यानंतर हे वार्षिक अथवा नववर्षाचे पंचांग वाचन केले जाते. त्यानुसार वार्षिक कामे हा बळीराजा करीत असतो.
रोगराई वाढेल
खरिपाचा स्वामी रवी तर रब्बीचा स्वामी शनी असल्याने पाऊस कमी पडून धनधान्य कमी पिकेल. लोक रोगग्रस्त होतील. चोरांचा मोठा त्रास होईल. अशाचमुळे भयंकर कृत्ये घडून सुखाचा नाश होईल.
चैत्र महिना नवलाईचा
नववर्षाची सुरुवात होणाऱ्या चैत्र महिन्याची सुरुवात ही मनाला प्रसन्न करणारी अशीच असते. याच महिन्यापासून अनेक सण, उत्सव यास सुरुवात होते. तर ग्रामदैवतासह जे पंचांग वाचन होते ते वर्षभर कामी येते. याला आधारून बळीराजा वर्षभर शेतीची कामे करीत असतो.
हेही वाचा