थिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

टेंभू योजनेचे खरे जनक स्व. गणपतराव देशमुख

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिवेशनात प्रतिपादन

Spread the love

कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत, टेंभू उपसा सिंचन योजनेच्या १ हजार ४१६ कोटीच्या रकमेच्या मूळ प्रकल्पास शासनाने १९९६ ला प्रशासकीय मान्यता दिली. तर टेंभूच्या प्रथम सुधारित प्रकल्पाच्या २ हजार १०६ कोटीच्या २००४ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. टेंभू उपसा सिंचन प्रकल्पास केंद्रीय जल आयोगाने २०११ ला ३ हजार ४५० कोटी किमतीच्या अंदाज पत्रकास मान्यता दिली आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे टेंभू योजनेसाठी खूप मोठे योगदान आहे. दुष्काळी सांगोला तालुक्याला पाणी मिळण्यासाठी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संघर्ष केला. टेंभू योजनेचे तेच खरे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. याच दरम्यान विधानसभेच्या सभागृहामध्ये चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मत व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
टेंभू विस्तारित योजनेसाठी सुधारित १०९ गावे प्रस्तावित आहेत. १५ एप्रिलपर्यंत याला मान्यता देण्यात येईल. नंतर प्रशासकीय मान्यता सुद्धा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हरितक्रांतीचे जनक
महाराष्ट्र विधानसभेचे जेष्ठ सदस्य स्व. गणपतराव देशमुख यांनी १९६२ ते २०१९ अखेरपर्यंत महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे कामकाज ५५ वर्ष पाहिले. स्व. आमदार भाई गणपतराव देशमुख यांचा आवर्जून उल्लेख टेंभू विस्तारित योजनेच्या संदर्भाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला.

स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे टेंभू योजनेसाठी खूप मोठे योगदान आहे. सांगोला तालुक्याचा दुष्काळी तालुक्याला पाणी मिळण्यासाठी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संघर्ष केला, हे आवर्जून सभागृहाला सांगितले पाहिजे असे ते म्हणाले.

स्व. गणपतराव देशमुख यांनी आटपाडी येथे दुष्काळी तालुक्यासाठी कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक पाणी परिषदा घेतल्या आहेत.

महत्त्वाकांक्षी योजना
या टेंभू योजनेमध्ये एकूण सात तालुके आहेत. त्यामध्ये, कराड, कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमंकाळ, व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इत्यादी तालुक्याचा समावेश टेंभू योजनेमध्ये स्वर्गीय आबासाहेबांच्या प्रयत्नाने त्यावेळेस करण्यात आला. टेंभू हे गाव कराड तालुक्यामध्ये असून तेथून बंदिस्त पाईपलाईनद्वारे व उचल पाण्याद्वारे शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

त्यातून एक लाख १८ हजार ८५६ हेक्टर जमीन ओलिताखाली येत आहे. एकूण ४५० किलोमीटरची ही योजना कार्यान्वित आहे. ही योजना सध्या प्रगतीपथावर आहे. विस्तारित योजनेचे काम स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतले आहे.

अनेक पाणी परिषदा घेतल्या
स्व. गणपतराव देशमुख यांनी आटपाडी येथे दुष्काळी तालुक्यासाठी कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक पाणी परिषदा घेतल्या आहेत.

सभागृहात उल्लेख
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहामध्ये स्वर्गीय आबासाहेबांचे टेंभू योजनेसाठी केलेले प्रयत्न याचा उल्लेख आवर्जून केला. त्यावेळचे तात्कालीन जलसंधारण मंत्री गिरीशजी महाजन व देवेंद्र फडणवीस यांचा त्यावेळी स्वर्गीय आबासाहेबांनी आवर्जून सत्कार केला होता. याचीही आठवण सभागृहाला करून दिली. विशेषत: सांगोला तालुक्याला टेंभू योजनेचा मोठा फायदा होणार आहे. वंचित गावांना लवकरच कायमस्वरूपी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत, टेंभू उपसा सिंचन योजनेच्या १ हजार ४१६ कोटीच्या रकमेच्या मूळ प्रकल्पास शासनाने १९९६ ला प्रशासकीय मान्यता दिली. तर टेंभूच्या प्रथम सुधारित प्रकल्पाच्या २ हजार १०६ कोटीच्या २००४ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. टेंभू उपसा सिंचन प्रकल्पास केंद्रीय जल आयोगाने २०११ ला ३ हजार ४५० कोटी किमतीच्या अंदाज पत्रकास मान्यता दिली आहे.

केंद्रीय जल आयोगाकडून मिळालेल्या मान्यतेनुसार टेंभूसाठी २२ टी.एम.सी. पाणी वापर प्रस्तावित आहे. यानुसार पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोयना, वांग, तारळी, आणि कृष्णानदीतून वाहून जाणारे पुराचे पाणी असे समाविष्ट करण्यात आले आहे.

टेंभू योजना आहे तरी काय?
– आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना
– कृष्णा नदीवरील कराड जवळील टेंभू गावाजवळ पाणी अडवून दुष्काळी भागाला उचल पाणीपुरवठा
– दुष्काळी सांगली, सातारा व सोलापुर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी
– सांगोला तालुक्यात 1 ते 50 कि.मी. लांबीचा कालवा
– तालुक्यात एकूण 20 हजार हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात
– सांगोला कालव्याद्वारे 17 हजार हेक्टर क्षेत्र तर कवठेम्हंकाळ कालव्याद्वारे 3 हजार क्षेत्र ओरिताखाली
– बंदिस्त पाईपलाईनचे एकूण 19 वितरिका द्वारे पाणीपुरवठा.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका