ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

सांगोल्यात राष्ट्रवादीत होणार भूकंप?

माजी सभापती अनिल मोटेंचा मोठा निर्णय

Spread the love

“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” या डायलॉगमुळे आमदार शहाजीबापू पाटील देशात प्रसिद्ध झाले. त्या डायलॉगमुळे माणूस रांगडा असावा असा सर्वांचा समज झाला. मात्र, इकडे त्यांच्या मतदारसंघात त्यांची प्रतिमा वेगळी झाली आहे. आपल्या विरोधकांची पक्की जिरवायची हेच तत्त्व अवलंबण्यात येत असल्याचा आरोप बापूंवर करण्यात येत आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेल्या सांगोला तालुक्यात आणखीन एक खळबळजनक घटना घडण्याची शक्यता आहे. आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडून विकासकामांच्या निधी वाटपात होत असलेल्या गलिश्च राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जि. प. सभापती अनिल मोटे यांनी राष्ट्रवादीसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते दीपकआबा साळुंखे – पाटील हे सध्या आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासोबत असले तरी येत्या निवडणुकीत शहाजीबापूंना पराभवाची धूळ चारण्यासाठी तुल्यबळ विरोधी पक्षाच्या दिशेने मोटे यांची पावले पडू लागली आहेत. (MLA Shahajibapu Patil Sangola)

चांगले काम करणाऱ्यांपुढे अडचणींचे “डोंगार”
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” या डायलॉगमुळे आमदार शहाजीबापू पाटील देशात प्रसिद्ध झाले. त्या डायलॉगमुळे माणूस रांगडा असावा असा सर्वांचा समज झाला. मात्र, इकडे त्यांच्या मतदारसंघात त्यांची प्रतिमा वेगळी झाली आहे. आपल्या विरोधकांची पक्की जिरवायची हेच तत्त्व अवलंबण्यात येत असल्याचा आरोप बापूंवर करण्यात येत आहे. शेकापची सत्ता असलेल्या ४० हून अधिक ग्रामपंचायतींची कामे रोखल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांनी रान उठवले. हीच स्थिती इतरांच्या बाबतीतही घडत आहे. (Shetkari Kamgar Paksh, Sangola)

सिर्फ मै डॉन.. बाकी सब येडे
आ. शहाजीबापू पाटील यांच्यावर त्यांचा विरोधी पक्ष असलेल्या शेकापकडून होणारे आरोप एकवेळ ध्यानात घेता येऊ शकतात. ते साहजिकही आहे. आता मात्र बापूंना विजयापर्यंत पोहोचविणाऱ्या माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सक्रिय आणि प्रभावी कार्यकर्ते तथा माजी सभापती असलेल्या अनिल मोटे यांनी बापूंवर निशाणा साधला आहे. (NCP leader Deepak Salunkhe-Patil, Sangola)

अनिल मोटे म्हणतात…
या राजकीय घडामोडीबाबत “थिंक टँक” प्रतिनिधीशी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशू संवर्धन सभापती अनिल मोटे म्हणाले की, “आमच्या पक्षाचे नेते माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानून आम्ही विधानसभेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. मनात इच्छा नसतानाही आम्ही हे काम केले. महाविकास आघाडीचे सरकार असेपर्यंत मी ज्या घेरडी जि. प. गटाचे नेतृत्व करतो त्या गटातील गावांना विकासकामांसाठी मुबलक प्रमाणात निधी मिळत होता. आता मात्र आमच्या गटावर बापू यांच्याकडून सातत्याने अन्याय होतो. कवडीचाही निधी मिळत नाही. आमची गळचेपी केली जाते.”

सांगोला तालुक्यात घेरडी जिल्हा परिषद गट हा महत्त्वपूर्ण आहे. या गटात सहभागी असलेल्या गावांची संख्या मोठी आहे. या गटात एकूण मतदार संख्या ४० हजारांच्या आसपास आहे. यामध्ये धनगर समाजाची संख्या तुलनेत जास्त आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बळकट आहे. अनिल मोटे हे पक्षातून बाहेर पडल्यास त्याचा फटका पक्षाला बसू शकतो. कारण मोटे कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग या गटात आहे.

अन् ही पणवती आली..
मोटे पुढे म्हणाले की, “महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावर आम्ही ज्यांच्यासाठी काम केले ते आ. शहाजीबापू पाटील आमच्या गटाला वाऱ्यावर सोडतील असे वाटले नव्हते. मात्र, त्याच्या उलटेच घडले. त्यांनी विकासकामांसाठी निधी मंजूर करताना आजतागायत आमच्यावर जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. आमची कामे मुद्दामहून बाजूला ठेवली जातात. त्यांचा अन्याय सहन करत लाचार का बनावे?”

अनिल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे सूतोवाच केले असले तरी ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. यावर विचारले असता ते म्हणाले की, “कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय लवकर घेणार आहोत. मात्र, आमदार शहाजीबापू पाटील यांना पराभूत करण्याची ताकद असलेल्या पक्षात नक्की जावू.”

बापूंच्या कार्यकर्त्यांकडून छळ
अनिल मोटे म्हणाले की, “आ. पाटील यांच्याकडून निधी दिला जात नाही. उलट आपणास अडचणीचे ठरणाऱ्या कार्यकर्त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांचे कार्यकर्ते करतात. मात्र, आम्ही त्यांना पुरून ऊरू शकतो.” असे मोटे म्हणाले.

या गटातील विविध प्रकारची विकासकामे सुचवली होती मात्र त्याला कोलदांडा घालण्यात आला. निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांचे खच्चिकरण करून छळ केला जात असताना आता सहन करणे शक्य नाही. आपली ताकद दाखवून देवू” असे अनिल मोटे यांनी सांगितले.

आबांनी बापूंची साथ न सोडल्याने ही वेळ
अनिल मोटे म्हणाले की, “माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी एका ठराविक टप्प्यापर्यंत आ. पाटील यांना साथ देवून बाजूला व्हायला हवे होते. आपल्या पक्षाचे त्यात हित होते. कारण राज्यात आपण भाजप – शिवसेनेच्या विरोधात आहोत. मात्र तसे झाले नाही. आबा हे बापुंसोबतच आहेत. आबा हे बापूंसोबत असतानाही बापूंच्या कार्यकर्त्यांकडून आमचा छळ होणार असेल तो आम्ही का सहन करावा?

माजी सभापती अनिल मोटे

आमच्यावर होत असलेल्या या अन्यायाबाबत, निधी मंजूरीच्या दूजाभावाबाबत आम्ही आबांना वारंवार सांगितले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आमचा विचारच होणार नसेल आणि बापूंकडून अन्याय थांबणार नसेल तर आपण सोबत का राहावे? शेवटी नाईलाज म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. आबांनी बापूंची साथ न सोडल्याने ही वेळ आली आहे”, अशी खंत मोटे यांनी व्यक्त केली.

पुढील दिशा कोणती?
अनिल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे सूतोवाच केले असले तरी ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. यावर विचारले असता ते म्हणाले की, “कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय लवकर घेणार आहोत. मात्र, आमदार शहाजीबापू पाटील यांना पराभूत करण्याची ताकद असलेल्या पक्षात नक्की जावू.”

अनेक कामांना दावला गुवाहाटीचा रस्ता
अनिल मोटे यांनी महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडे घेरडी गटातील अनेक विकासकामे सुचविली होती. त्यामध्ये सोनंद – गळवेवाडी, मंगळवेढा ते सांगोला या मार्गावरील सांगोला तालुका हद्दीतील गावांचा रस्ता, आगलावेवाडी ते जवळा रस्ता आदी रस्ताकामाचा समावेश होता. मात्र या मागणीला गुवाहाटीचा रस्ता दाखविण्यात आला. अनेक वर्षांनंतर जवळा ते कडलास रस्त्याचा वनवास संपला असला तरी हा रस्ता प्रचंड नित्कृष्ट आहे.

या गटातील विविध प्रकारची विकासकामे सुचवली होती मात्र त्याला कोलदांडा घालण्यात आला. निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांचे खच्चिकरण करून छळ केला जात असताना आता सहन करणे शक्य नाही. आपली ताकद दाखवून देवू” असे अनिल मोटे यांनी सांगितले.

मोटे म्हणाले की, “सांगोला मतदार संघासाठी ७० कोटींचा निधी आणला असल्याचे आमदार सांगत आहेत. त्यातील किती टक्के रक्कम घेरडी गटाला दिली हे त्यांनी सांगावे. भाई गणपतराव देशमुख हे लोकप्रतिनिधी असताना सर्व गटांना समान विकासनिधी देत असत. आपल्या विरोधकांनाही ते निर्णय घेताना विश्वासात घेत असत. त्यांच्यावर अन्याय करत नसत. आम्ही विद्यमान लोकप्रतिनिधींसोबत होतो. विरोधात नव्हतो. तुमच्यासोबत असतानाही तुम्ही आमच्यावर अन्याय करणार असाल तर आम्ही तुमच्यामागे आमची फरफट का करून घ्यावी? तुम्हाला निवडणुकीत दाखवून देवू” असे अनिल मोटे यांनी सांगितले.

कोण आहेत अनिल मोटे?
अनिल मोटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घेरडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती म्हणून काम केले आहे. अनिल मोटे यांचे आजोबा अण्णा सोमा मोटे हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांचे आणि भाई गणपतराव देशमुख त्यांचे निकटचे संबंध होते. अनिल मोटे यांचे वडील तानाजी मोटे यांनी यापूर्वी शेकापमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी भाजपमध्येही ४ वर्षांहून अधिक काळ काम केले आहे.

अनिल मोटे यांचे वडील तानाजी मोटे यांनी २०१०-११ साली घेरडी गावात राष्ट्रवादीची सत्ता आणली. शंकर जगधने हे सरपंच बनले. अनिल मोटे यांचे चुलते दिलीप मोटे यांचीही या भागात ताकद आहे. त्यांचेही अनिल मोटे यांना चांगले बळ मिळत असते. अनिल मोटे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २०१७ साली घेरडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य म्हणून विजयी झाले.

माजी सभापती अनिल मोटे यांनी आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते पक्षात कुचंबणा सहन करत असल्याचा गौप्यस्फोट केला.

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी आपल्या कार्यकाळात कृषी व पशूसंवर्धन विभागाच्या लाभाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कामकाजावर बोट ठेवत अनेक प्रकरणे बाहेर काढली होती. ती राज्यभरात गाजली. प्रशासनात एक अभ्यासू सभापती म्हणून त्यांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळविली.

घेरडी गटाची ताकद किती?
सांगोला तालुक्यात घेरडी जिल्हा परिषद गट हा महत्त्वपूर्ण आहे. या गटात सहभागी असलेल्या गावांची संख्या मोठी आहे. या गटात एकूण मतदार संख्या ४० हजारांच्या आसपास आहे. यामध्ये धनगर समाजाची संख्या तुलनेत जास्त आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बळकट आहे. अनिल मोटे हे पक्षातून बाहेर पडल्यास त्याचा फटका पक्षाला बसू शकतो. कारण मोटे कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग या गटात आहे.

“..तर दीपकआबा आमदार झाले असते”
“दीपकआबांनी आपले उभे आयुष्य इतरांसाठी खर्ची घातले. आम्ही जेव्हापासून राष्ट्रवादी पक्षात होतो तेव्हापासून तनमन धनाने काम केले. कोणाची चिरीमिरी घेतली नाही. आबांनी बापूंची साथ सोडली तरच पक्षातील कार्यकर्त्यांची कुचंबणा थांबेल. एवढेच करून चालणार नाही तर त्यांनी लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत जाण्यासाठी विचार करावा. तसे झाले असते तर आम्ही जीवाचे रान करून त्यांना आमदार केले असते. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आम्हाला आमचा आणि गटातील लोकांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागणार आहे” असे अनिल मोटे यांनी सांगितले.

माजी सभापती अनिल मोटे यांनी आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते पक्षात कुचंबणा सहन करत असल्याचा गौप्यस्फोट केला.


हेही वाचा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका