ताजे अपडेटथिंक टँक स्पेशल

शालेय पोषण आहारात चक्क प्लास्टिकचा तांदूळ

घेरडीच्या सरपंचांनी उघडकीस आणला प्रकार

Spread the love

हा विषय घेरडी गावापुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा विषय आहे.ही बाब घेरडीच्या कर्तव्यदक्ष महिला सरपंच सुरेखाताई पुकळे आज उघडकीस आणला. कारण त्यांची मुलगी याच जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. योगायोगाने ही गंभीर बाब उघडकीस आल्याने याच शाळेला डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भेट देवून,परिस्थिती जाणून घेतली. तर अन्नभेसळ अधिकाऱ्यांना तात्काळ दखल घ्या असे सांगितले.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
शालेय पोषण आहारातील रेशनच्या तांदळात चक्क प्लास्टिक तांदूळ आढळला आहे. हा प्रकार सांगोला तालुक्यातील घेरडी येथील सरपंच सुरेखाताई पुकळे यांनी उघडकीस आणला असून, याची ही तक्रार अन्न भेसळ विभागाकडे केलेली आहे. हा विषय घेरडी गावापुरताच मर्यादित नसून सोलापूर जिल्ह्यात पुरवठा करण्यात आलेल्या सर्वच शाळांमध्ये असा प्रकार झाला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

असाच प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातही पिवळ्या व केशरीमधील प्राधान्य गटाला रेशन दुकानातून गहू व तांदूळ वितरण केले जात आहे. अनेकवेळा या वितरणाबाबत तसेच खराब धान्य पुरवठा केल्याबद्दल तक्रारी होतात. परंतु शहरातील सांगली रोडवर परिसरात असलेल्या रेशन दुकानातून लाभार्थ्याला मिळालेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व रबरमिश्रीत तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शालेय पोषण आहारात मुलांना देण्यात येणाऱ्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचा हुबेहूब तांदूळच पुरावठा देण्यात आलेला आहे. पण हा तांदूळ प्लास्टिकचाच आहे. आज याबाबत घेरडी येथील शाळेत सरपंच सुरेखाताई पुकळे यांची तातडीची बैठक लावून असे हे तांदूळ मुलांना देवू नका. याची गुणवत्ता तपासा असेच संबंधित शिक्षकांना सांगितले.

शालेय पोषण आहारातील रेशनच्या तांदळात चक्क प्लास्टिक तांदूळ आढळला आहे.

याच वेळी पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांना ही बाब प्रत्यक्षात दाखविण्यात आली. त्याच दरम्यान संबंधित केंद्रप्रमुखांनी सोलापूर येथील अन्नसुरक्षा अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता गुरुवारी याच तांदळाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येथील त्यानंतर काही ते बघू असे अन्नसुरक्षा अधिकारी यांची सांगितले.

असाच प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातही पिवळ्या व केशरीमधील प्राधान्य गटाला रेशन दुकानातून गहू व तांदूळ वितरण केले जात आहे. अनेकवेळा या वितरणाबाबत तसेच खराब धान्य पुरवठा केल्याबद्दल तक्रारी होतात. परंतु शहरातील सांगली रोडवर परिसरात असलेल्या रेशन दुकानातून लाभार्थ्याला मिळालेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व रबरमिश्रीत तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हा विषय घेरडी गावापुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा विषय आहे.ही बाब घेरडीच्या कर्तव्यदक्ष महिला सरपंच सुरेखाताई पुकळे आज उघडकीस आणला. कारण त्यांची मुलगी याच जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. योगायोगाने ही गंभीर बाब उघडकीस आल्याने याच शाळेला डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भेट देवून,परिस्थिती जाणून घेतली. तर अन्नभेसळ अधिकाऱ्यांना तात्काळ दखल घ्या असे सांगितले.

या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वस्तुस्थिती जाणून घेऊन अधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची गरज आहे.

घेरडी येथील सरपंच सुरेखाताई पुकळे यांचा व्हिडिओ

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका