जवळ्यातल्या दाम्पत्याने कोल्हापुरात मूल चोरलं
तपासानंतर समोर आलं धक्कादायक वास्तव

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
कोल्हापुरातून एका 6 वर्षांच्या चिमुरड्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिर परिसरामधून एका दाम्पत्याने मुलाला चोरलं होतं. पोलिसांनी अवघ्या 48 तासांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील जवळा गावातून या मुलाची सुटका केली आहे. या दोन्ही आरोपी दाम्पत्याला मुलं नाही, त्यामुळे त्यांनी या मुलाला आमिष दाखवलं आणि त्याला चोरून नेलं. Think Tank Live
दरम्यान 48 तासातच पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक केली आहे. ही कारवाई सोलापूर जिल्ह्यातील जवळा गावात पाेलिसांनी केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी मोहन शितोळे आणि त्याची पत्नी या दाेघांना अटक केली आहे. स्वतःला मूल नसल्याने संबंधित सहा वर्षाच्या मुलाला त्यांनी चाेरल्याची कबुली दिल्याची माहिती पाेलिसांनी सांगितली. Think Tank Live
बाळूमामा मंदिर परिसरामधून मूल चोरलं
कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिर परिसरामधून एका दाम्पत्याने मुलाला चोरलं होतं. या मुलाच्या चोरीची दृष्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. आपल्या लेकराला कोणीतरी पळवून नेल्याने त्या लेकराचे माता- पिता धाय मोकलून रडत होते.
या मुलाला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं होतं, त्यामुळे पोलिसांनी तब्बल 100 ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. सीसीटीव्ही फुटेजची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले होते. संत बाळूमामा मंदिर येथे दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. त्यातच लहान मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती.
पोलिस जवळा गावापर्यंत पोहोचले
कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरापासून सुरू झालेला हा प्रवास सोलापूर जिल्ह्यातल्या जवळा गावापर्यंत पोहोचला. कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत या प्रकरणाचा छडा लावला.
सांगोला तालुक्यातील जवळा गावात जाऊन या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरी करण्यात आलेल्या मुलाची सुटकाही करण्यात आली. या प्रकरणी आरोपी मोहन शितोळे आणि त्याची पत्नी छाया शितोळे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
मुल नसल्याने केली चोरी
या दोन्ही आरोपी दाम्पत्याला मुलं नाही. कित्येक दिवसांपासून ते मुलासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्यात त्यांना यश मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी या मुलाला आमिष दाखवलं आणि त्याला चोरून नेलं, असे त्यांनी तपासात सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे.
48 तासांमध्ये आरोपींना अटक करून मुलाची सुटका केल्यामुळे पोलिसांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला आहे. मागच्या काही काळामध्ये मुलांना चोरून नेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. या मुलांचा शोध घेणं पोलिसांसाठीही बरेच वेळा आव्हानात्मक काम असतं, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मुलांचा हात न सोडलेलंच बरं, असा पोलिसांनी सल्ला दिला आहे.
मंदिरातील गर्दीचा फायदा उठविला
स्वतःला मुल नसल्याने या संशयित आरोपींनी नेहमी गर्दी असणारे संत बाळूमामा यांचे मंदिर निवडले. तेथे राज्यभरातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या गर्दीचा फायदा उठवून या संशयित आरोपींनी आमिष दाखवून या मुलाला पळवून नेले. मात्र या भागात सर्वत्र सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याने त्यांचा चोरीचा डाव अंगलट आला. तब्बल दीडशेहून अधिक किलोमिटर अंतर पार करून अवघ्या ४७ तासांत पोलिसांनी जवळा गावात या आरोपींना पकडले.
या चोरीच्या घटनेमुळे सांगोला तालुक्यातील जवळा गाव राज्यात चर्चेत आले आहे.
नेहमी शांत असलेल्या जवळा गावात यापूर्वी अशा घटना कधीही घडल्या नाहीत. या गावाला आदर्श विचारांचा वारसा आहे.
हेही पाहा