गुन्हेगारी

अतिक अहमदच्या हत्येनंतर पत्नी पोलिसांना शरण

पोलिसांनी जाहीर केले होते इनाम

Spread the love

अतिकची दोन अल्पवयीन मुले स्मशानभूमीत पोहोचली होती. पोस्टमॉर्टमनंतर 16 एप्रिलला सायंकाळी अतिक आणि अश्रफ यांचे मृतदेह कासारी-मासारी स्मशानभूमीत आणण्यात आले. ज्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये अशरफचा मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आला, त्याच अ‍ॅम्ब्युलन्सने अतिकच्या दोन अल्पवयीन मुलांना बालगृहातून आणले.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
कुख्यात डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्यावर तणावग्रस्त वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अतिक अहमद याची पत्नीही उपस्थित होती. अंत्यसंस्कारानंतर तिने पोलिसांपुढे शरणागती पत्करली. (Atiq Ahmed’s Murder, His Wife Shaista Parveen Surrender)

दोघा भावांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी उमेश पाल हत्येतील आरोपी अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन रविवारी आत्मसमर्पण करू शकते. अशा बातम्या देखील येऊ लागल्या होत्या. यानंतर अतिक अहमदच्या अंत्ययात्रेवेळी त्याची फरार असलेली पत्नी शाइस्ता परवीन पोलिसांना शरण आली.

पाल हत्याकांडातील आरोपी
उमेश पाल हत्येनंतर शाइस्ता परवीनवर 50000 रुपयांचे बक्षीस ठेवले होते. अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन ही उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असून हत्येपासून यूपी पोलीस तिचा शोध घेत होते. परंतु आपल्या पतीच्या अंत्ययात्रेत शाइस्ता परवीन पोलिसांना शरण आली. शाइस्ता परवीनचा वकील विजय शर्मा यांनी या आगोदर शाइस्ता परवीन आज शरण येऊ शकते असे म्हटले होते. ते शब्द खरे ठरले.

शरीरात 8 गोळ्या
16 एप्रिलला अतिक आणि अश्रफ यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. आज तकच्या बातमीनुसार, प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे आढळून आले आहे की, गोळीबारादरम्यान अतिकच्या शरीरात 8 गोळ्या लागल्या. अहवालानुसार, अतिकच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर, पोटावर आणि कंबरेला गोळ्या लागल्या होत्या. तर अश्रफला 5 गोळ्या लागल्या. अश्रफ यांच्या मानेवर, पाठीवर, मनगटावर, पोटावर आणि कमरेला गोळ्या लागल्या होत्या. तर तीन गोळ्या शरीराच्या आर – पार झाल्या होत्या.

बापाचे अंत्यदर्शन घ्यायला अल्पवयीन मुले
अतिकची दोन अल्पवयीन मुले स्मशानभूमीत पोहोचली होती. पोस्टमॉर्टमनंतर 16 एप्रिलला सायंकाळी अतिक आणि अश्रफ यांचे मृतदेह कासारी-मासारी स्मशानभूमीत आणण्यात आले. ज्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये अशरफचा मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आला, त्याच अ‍ॅम्ब्युलन्सने अतिकच्या दोन अल्पवयीन मुलांना बालगृहातून आणले. अश्रफ यांच्या दोन्ही मुलीही स्मशानात पोहोचल्या. अतिक अहमद आणि अशरफ यांच्या अंत्यसंस्कारासाठी जवळचे नातेवाईक पोहोचले. यादरम्यान प्रयागराजमधील कासारी-मासारी स्मशानभूमीबाहेर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी मोजक्याच लोकांना प्रवेश दिला. यावेळी पोलिसांनी बुरख्यात आलेल्या महिलांवर विशेष नजर ठेवली होती.

अतिक : आमदार, खासदार… अब्जाधीश
अतीकचे संपूर्ण जीवन गुन्हेगारीने व्यापले होते. गुन्हेगार आणि राजकारणाच्या इशाऱ्यावर तो नाचला. त्याने अब्जावधींचे साम्राज्य उभे केले. गुंडगिरीतून कायदा खिशात घालून तो वावरला. १९६२ मध्ये अलाहाबादच्या धूमनगंजमध्ये जन्मलेल्या अतीकचे वडील गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. त्यामुळे गुन्ह्याचा त्याला वारसा मिळाला होता. त्यातच तो लहानाचा मोठा झाला. त्याच्यावर १९७९ मध्ये पहिला खटला चालवला गेला. तो पुढे राजकारणात उतरला. २७ व्या इ वर्षी आमदार झाला. त्याच्यावर १०० हून जास्त गुन्हे दाखल आहेत.

४४ वर्षांत पहिल्यांदा त्याला उमेश पाल अपहरण प्रकरणात जन्मठेप झाली. त्याच्या गँगचा क्रमांक २२७ होता. राजकारण – गुन्हेगारी जीवन जगणाऱ्या अतीकने कोट्यवधींची माया जमवली होते. डझनभर राज्यांत त्याने पाय पसरलेले होते. खंडणी, अनेक प्रकारची कंत्राटे यातून त्याने अब्जावधी रुपये कमावले. उमेशपाल हत्याकांडनंतर त्याची ४१५ कोटींची संपत्ती जप्त झाली. एकूण २३६८ कोटी रुपयांचा आर्थिक तडाखा देण्यात आला.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका