सांगोल्यात डोक्यात दगड घालून एकाचा खून
सांगोला (तालुका प्रतिनिधी)
अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून सेंट्रिंग काम करणाऱ्या इसमाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवार दि.१९ जुन रोजी सांगोला शहरातील मिरज रेल्वे गेट ते वंदे मातरम चौक जाणाऱ्या रेल्वे स्टेशन समोरील (लांडगे मळा) बायपास रोडवर घडली आहे.
संतोष जगन्नाथ साळुंखे वय ५० रा.सांगोला असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
अश्विनी संदेश निकम रा. वाटंबरे, ता. सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे वडील संतोष जगन्नाथ साळुंखे हे सांगोला येथे मुकादम शाहीद जाफर मुलाणी यांच्यासोबत सेंट्रींगचे काम करत होते. त्यांचे ज्या ठिकाणी काम चालू आहे. त्याचे आसपासचे परिसरात वडील संतोष साळुंखे राहत होते. त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते. ते मोबाइल वापरत नव्हते. ते अधुन मधून गावी अकोला येथे येवून भेटून परत जात होते.
सोमवार दि. १९ जुन रोजी फिर्यादी ही गावातील प्रकाश शिंदे यांच्या शेतात मजुरी करीता गेली असताना सकाळी साडेनऊ वा. चे. सुमारास सांगोला पो. कॉ.आप्पासो पवार यांनी फोन करून सांगितले की, “तुमचे वडील सांगोला रेल्वे स्टेशनच्या समोरील बायपास रोडच्या पश्चिम बाजुस रस्त्याच्या कडेला मयत अवस्थेत पडलेले आहेत, तुम्ही लवकर या” असे सांगितल्याने फिर्यादी व मामा सागर बबन निकम यांनी घटनास्थळी जावून पाहिले असता रस्त्याच्या बाजुला वडील संतोष साळुंखे मयत अवस्थेत पडले होते.
त्यांच्या डोक्याला ,नाकाला जखम झालेली दिसली व कानातून रक्त आलेले आहे तसेच डोक्याचे शेजारीच एक मोठा दगड पडलेला दिसला.
वडील ज्या ठिकाणी पडलेले आहेत त्या ठिकाणापर्यंत रक्त सांडलेले दिसत होते याबाबत मुलगी अश्विनी कदम हीने वडील संतोष साळुंखे यांचा रविवार दि.१८ रोजी दुपारी १२ वा. ते दि. १९ रोजी सकाळी साडेनऊ वा. चें दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणांवरुन त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खुन केला असल्याबाबत अज्ञात इसमाविरोधात भा.द वि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने सांगोला व परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा