ताजे अपडेट

सांगोल्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदारांकडून कामांचा धडाका

आंदोलनाआधीच मागणीची दखल घेत बोलावली बैठक

Spread the love

स्वाभिमानी होलार समाज संघटना तसेच विविध बहुजन संघटनांकडून विविध मागण्यांसाठी सोमवार, 19 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता पंचायत समिती समोरील सांगोला – पंढरपूर रस्त्यावर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. (Sangola, Pandharpur, Solapur)

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोला तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संजय खडतरे यांनी तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कामांचा धडाका लावला आहे. एका सामाजिक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची तातडीने दखल घेत बैठक आयोजित करून आपल्या संवेदनशीलतेने दर्शन घडविले आहे. (Sangola Tahasildar Sanjay Khadtare)

स्वाभिमानी होलार समाज संघटना (Swabhimani Holar Samaj Sanghatana) तसेच विविध बहुजन संघटनांकडून विविध मागण्यांसाठी सोमवार, 19 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. विविध अकरा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.

या अकरा मागण्यांमध्ये बँकाकडून मुद्रा लोन (Mudra Loan) देण्यास टाळाटाळ केली जात असून बेरोजगारांना तातडीने कर्ज मिळण्यासाठी बँक शाखाधिकारी यांची बैठक घ्यावी अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली होती. (Micro Finance)

होलार समाजाचे नेते शिवाजीराव जावीर, बहुजन नेते बापूसाहेब टोकळे, दिपक (आबा) ऐवळे यांनी हे निवेदन दिले होते.

या रास्ता रोको आंदोलनची दखल घेत तहसिल कार्यालय सांगोला येथे दिनांक २१/०६/२०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता सर्व बँक शाखाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस येताना सर्व बँक शाखाधिकारी यांनी कर्ज देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून किती इष्टांक दिलेला होता व त्यापैकी किती शेतक – यांना कर्ज उपलब्ध करुन दिले व अद्याप किती शेतक – यांना देणे शिल्लक आहेत इत्यादी माहितीसह बैठकीस हजर राहणेबाबत कळविण्यात आले आहे.

बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, लीड बँक सांगोला, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांच्या शाखाधिकारी यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. (Bank of India, Bank of Maharashtra, Solapur District Co – Operative Bank, State Bank of India, Lead Bank)

सोमवारी आंदोलन
स्वाभिमानी होलार समाज संघटना तसेच विविध बहुजन संघटनांकडून विविध मागण्यांसाठी सोमवार, 19 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता पंचायत समिती समोरील सांगोला – पंढरपूर रस्त्यावर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. (Sangola, Pandharpur, Solapur)

काय आहेत मागण्या
१) होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. २) होलार समाज अभ्यास आयोग नेमावा. २) नाझरा येथील युवक नेते नितीन रणदिवे यांच्यावर दाखल झालेल्या खोटा गुन्हा परत घ्यावा. ३) अक्षय भालेराव यांच्या खुन करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व कुटूंबाचे पुनर्वसन करावे. ४) अनकढाळ येथे राष्ट्रीय महामार्ग पोलिस स्टेशन कायम स्वरुपी स्थापना करावे. दर्शनी फलक लावावेत. ५) बेरोजगार युवकांना रोजगारासाठी मुद्रा लोन तात्काळ मिळवण्यासाठी मा. तहसिलदार यांनी तालुकास्तरीय मिटिंग आयोजीत करावी. ६) वाद्य कलावंतांना दरमहा १५ हजार रुपये मानधन मिळावे. ७) मागील अनेक वर्षापासून बंद असलेले केशरी कार्डधारकांचे धान्य चालू करावे. ८) दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून प्रत्येकी ५ एकर जमीन मिळावी. ९) सांगोला शहरात होलार समाजाला बहुद्देशिय सभागृह उभारण्यात यावे. १०) ग्रामपंचायत हद्दीत पूर्वीपासून राहण्याच्या नागरिकांना त्या जागा नोंदीत करून महाराष्ट्र शासन हे जागा मालका पूर्वी लिहिन्यात आले आहे ते वगळून मूळ मालकाच्या नावे असिसमेंट ग्रामपंचायत उतारा देण्यात यावा. सर्व खुल्या जागा नियमित करण्यात याव्यात. ११) रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजना अनुदान २.५०.००० लाख रुपये करण्यात यावे. वरील मागण्या शासन दरबारी मान्य करण्यासाठी होलार समाज व बहुजन समाजाच्या समविचारी सामाजिक संघटनांच्या कार्यकर्ते नेते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक दिपक (आबा) ऐवळे यांनी केले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका