थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
आपल्या भाषणाने संपूर्ण – महाराष्ट्राला हसविणारे व महाराष्ट्रात ‘ छोटा पुढारी ‘ अशी ओळख असलेल्या घनश्याम दराडे यांच्या चारचाकी वाहनाचा पुणे – सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता . हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अपघात झाल्याची घटना घडली आहे. दराडे यांच्या अपघातग्रस्त वाहनात , दराडे यांचे आई – वडील, व आणखी दोघेजण असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दराडे यांच्या आईला किरकोळ जखम झाली असून, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. (Chota Pudhari Ghanshyam Darode)
अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार , घनश्याम दराडे यांचे आई- वडील , व आणखी दोघेजण पुणे – सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचनहुन पुण्याच्या बाजूने निघाले होते. याचवेळी सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फाट्यावर अचानक एक वाळूच्या डंपरने दराडे यांच्या चारचाकीला चालकाच्या उजव्या बाजूने ठोसर दिली. या अपघातात चारचाकी गाडीचे नुकसान झाले असून अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळतात. दराडे स्वतः घटनास्थळी पोचले होते. लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी पोचले असून, अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. (Chota Pudhari Ghanshyam Darode car accident)
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभोर मुक्कामी असल्याने शेकडो पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरच्या बाजूने येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. तरीही हा डंपर महामार्गावर कसा आला व अपघात कसा झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण आहे छोटा पुढारी घनश्याम दरोडे
छोटा पुढारी घनश्याम गावातील राजकारणापासून ते तालुका राज्यातील परिस्थितीवर जेव्हा तो बोलू लागतो तेव्हा त्याच्या शाब्दिक फटकाऱ्यांनी अनेकजण निरूत्तर होतात. वीज, पाणी, शेती, सहकार, बाजारभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळावर उपाय आदी अनेक प्रश्नांवर तो बेधडक बोलतो. विशेष म्हणजे त्याच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशी त्याची उदाहरणे परिपक्व असतात. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्याच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याच्या मुलाखती प्रसारित केल्याने छोटा घनश्याम रातोरात स्टार झाला.
वय अठरा ते वीस वर्षे. श्रीगोंद्याचा घनश्याम दत्तात्रय दरोडे (टाकळी लोणार) हा छोटा पुढारी आपल्या वाक्बाणांनी सरकारसह अनेकांना घायाळ करत आहे. त्याचे शाब्दिक पंच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बेधडकपणे आपले मत व्यक्त केल्यानंतर तो ‘तुम्हीच सांगा बरं राव, आँ’ असे विचारण्यासही विसरत नाही.
बहिणीनंतर आई-वडिलांना घनश्याम हा एकुलता एक मुलगा. शेतकरी कुटुंबात तो वाढला. घरची परिस्थिती जेमतेम. काही दिवस तो घारगावच्या (ता. श्रीगोंदे) आश्रम शाळेत शिकत होता. पुढे तो मूळ गावी परतला. त्याची खरी ओळख झाली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान. माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच्या विरोधात त्याने राहुल जगताप (राष्ट्रवादी) यांचा प्रचार केला. त्याच्या भाषणांना टाळ्यांचा पाऊस पडत होता. पाचपुते पडले जगताप आमदार झाले. यातून घनश्यामचा आत्मविश्वास दुणावला. घनश्यामला वाचनाची आवड आहे. स्थानिक ते जागतिक घडामोडींवर त्याचे लक्ष असते.
आत्ता घनश्याम कुठे असतो तर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर. तो राज्यभरात कुठेही जातो. अजित पवारांवर त्याच विशेष प्रेम आहे. मोठमोठ्या सभेत देखील त्याला बोलवलं जातं आणि तो भाषण ठोकत असतो.
घनश्यामने शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी पुढे जाऊन जिल्हाधिकारी व्हायचा निर्णय घेतला आहे. व्यवस्था परिवर्तन करायची आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून द्यायचा आहे. ते कसं विचारल तर तो ठासून सांगतो. त्याचा दहावीचा निकाल लागला.५१% मार्क मिळाले. गणितात ३५ आणि इंग्रजीत ३७ मार्क होते. मिडीयाने तेव्हा सुद्धा त्याची मुलाखत घेतली. तेव्हा हा गडी अंगात शेरवानी घालून गप्पा मारत होता.
अंगावर पुढाऱ्यांच्या सारखा वेश, हातात काकाचं नाहीतर मामाच्या साईजच घड्याळ, पायावर पाय टाकून बसून ऐटीत बोलण्याची स्टाईल. मधल्या काळात त्याला राजकीय प्रचाराला पुढाऱ्यानी फिरवलं. त्याला ऐकायला लोक सभेत गर्दी करू लागली. तेरा चौदा वर्षाच पोरग कसं टकामका बोलतय याचं बायाबापड्याना भारी कौतुक वाटत होत.
घनश्याम दराडे हा इयत्ता आठवीत असताना बालपणी झालेल्या कुठल्याशा असाध्य रोगामुळे उंचीची वाढ खुंटलेली.
पण आपल्या साडेतीन फुट उंचीचा आणि शहाणपणाचा संबंध नाही हे त्यानं दाखवून दिल. पहिल्या व्हिडिओ मध्ये त्याची तळमळ खरी वाटत होती. गावकडच्या शेतकऱ्यांच्या वीजपाण्याच्या रस्त्याच्या समस्या पुण्यामुंबईत एसीत बसणाऱ्या समजणार नाहीत हे खरच होत.