थिंक टँक स्पेशलराजकारण

सांगोल्यात कुरघोडीचे राजकारण

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक विश्लेषण

Spread the love

सांगोला तालुक्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना दलित, मुस्लिम, मागासवर्गीयांची मते चालतात. मात्र, त्यांना महत्त्वाच्या पदांवर योग्य प्रतिनिधित्व दिले जात नाही. हे प्रतिनिधित्व देण्याची नैतिक जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. सहकारी संस्थांसाठी दलित, मुस्लिम मागासवर्गीय मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची मते चालतात मात्र त्यांना अध्यक्षपद दिले जात नाही. हे खरेदी विक्री संघ, सूतगिरणी, औद्योगिक वसाहत निवडणुकीत दिसून आले आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांचे वारसदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी शेकापने मागासवर्गीय कार्यकर्त्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष करावे, असे मत बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी व्यक्त केलं आहे.

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट भाजपा काँग्रेस या बलाढ्य पक्षाची युती होऊन शेतकरी विकास आघाडीचे पॅनल म्हणून मतदारासमोर गेले. परंतु या आघाडीतच एकमेकांवर कुरघोडी झाल्याचे दिसून येते. तरीही स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी दिलेला विचार व आदर्शाचा विजय झाला असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दुसरीकडे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी सत्ताधारी शेकापला मागासवर्गीय कार्यकर्त्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष करावे असा सल्ला दिला आहे. सहकारी संस्थांसाठी दलित, मुस्लिम मागासवर्गीय मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची मते चालतात मात्र त्यांना अध्यक्षपद दिले जात नाही. हे खरेदी विक्री संघ, सूतगिरणी, औद्योगिक वसाहत निवडणुकीत दिसून आले आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांचे वारसदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी शेकापने मागासवर्गीय कार्यकर्त्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष करावे, असे मत बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी व्यक्त केलं आहे.

ग्रामपंचायत सदस्याच्या मतदारसंघातून परिवर्तन आघाडीतील उमेदवार बाबुराव गायकवाड यांना विजयी करण्यासाठी शेकाप सोडून इतर पक्षांनी खूप प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. गायकवाड हे अल्पशा पंचवीस मतांनी पराभूत झाले. याच गटात राष्ट्रवादीचे किशोर शिंदे यांना 492, शेकापचे समाधान पाटील यांना 389 मते, तर परिवर्तनचे गायकवाड यांना 364 मते मिळाली. या गटात शेकापचे पाटील यांना शंभर मते कमी मिळून निसटता विजय प्राप्त झाला आहे. जी शंभर मते पाटील यांना कमी पडली ती गायकवाड यांना मिळालेली दिसून येतात. त्यामुळे येथे आघाडी होऊनही दगाबाजी झाल्याचे दिसून येते.

त्याचप्रमाणे व्यापारी गटात शेकापचे अमजद बागवान यांना 206 मते, तर राष्ट्रवादीचे रामचंद्र बाबर यांना 158, व परिवर्तन आघाडीचे सुरज बनसोडे यांना सत्तर मते मिळाली. भाजपचे विजय सुपेकर यांना 25 मते मिळाली. या ठिकाणी शेकापच्या मतदारांनी सुरज बनसोडे यांना मदत केल्याचे दिसत आहे. तर इतर पक्षातील व्यापाऱ्यांनी विजय सुपेकर यांना मदत केल्याचे दिसत आहे.
वर्षभरावर आलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा या संस्थेच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, भाजपाला आपले स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर स्वबळावर निवडणूक लढविणे महत्त्वाचे आहे. शेकाप मधील नेते व कार्यकर्त्यामध्ये राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाची युती केल्याने खदखद दिसून आली आहे.

मोठ्या प्रमाणात नाराजी आहे असेही बोलले जाते. जर पुन्हा आघाडीचे राजकारण झाले तर शेकापचे आजपर्यंत तालुक्यात असलेले वर्चस्व संपून जाण्याची भीती शेकाप कार्यकर्ते खाजगीत व्यक्त करीत आहेत.

सचिन देशमुख यांनाही कमी समजून चालणार नाही. पक्षातील एकेक सरदार बाहेर पडू लागले तर सत्ता जाण्यास वेळ लागणार नाही. देशमुख यांची समजूत काढणे महत्त्वाचे आहे. सचिन देशमुख हे आबासाहेबांच्या विचाराच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. बावीस वर्षे आबासाहेबांच्या सावलीखाली वाढलेले सरदार असले तरी त्यांची ओळख फक्त 22 वर्षात कोळा गटापूर्ती राहिली आहे. बाहेरच्या गटात नाही. त्यांना जर स्वतःचे अस्तित्व वाढवायचे असेल तर तालुकाभर स्वतःच्या विचाराचा कार्यकर्ता तयार करावा लागेल. नाहीतर शेकाप बरोबर राहून आपले अस्तित्व वाढवावे लागणार आहे.

तालुक्यातील अनेक लोक आपले प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी व आपले काम करून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे जातात. ते जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवितात. जनतेची मने जिंकणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु त्यांनी आजपर्यंत मतदारातून एकही निवडणूक लढवली नाही. आता त्यांनी साठी ओलांडली आहे. त्यांनी स्वतःची ताकद मतदारातून दाखविणे गरजेचे आहे. पक्षातून संधी मिळाली ठीक नाहीतर अपक्ष उभे राहून ताकद दाखविणे गरजेचे आहे, असा सूर कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. वैयक्तिक कामासाठी इतर नेत्यांना मदत करा परंतु विधानसभा निवडणुकीत कोणालाही मदत न करता इतरांना मदत केली ते तुम्हाला किती मदत करतील हे विधान सभेच्या निवडणुकीत दिसून येईल. त्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवणे गरजेचे आहे. झाडाखालच्या रोपट्याची भूमिका सोडावी असे मतदारातून मत व्यक्त होत आहे.

विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी विकास कामासाठी गेली अडीच वर्षात निधी मोठ्या प्रमाणात आणलेला आहे. विकास कामे चालू आहेत. तालुक्यात दमदार राजकीय व्यक्ती म्हणून शहाजी बापू पाटील यांच्याकडे पाहिले जाते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोणालाही दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन निवडणूक लढविणे सोपे नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार असूनही एका जागेवर युती करण्यास समाधान मानावे लागले आहे. युती करून आमदार पाटील यांनी स्वतःची तालुक्यात ताकद दाखविण्याची संधी घालवली असल्याचे दिसत आहे. आमदार पाटील यांच्याजवळ आता मॅन पावर व मनी पावर दोन्ही चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे वर्षभरात येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणाशीही युती न करता स्वतंत्र निवडणूक लढवली तर अस्तित्व राहील. नाहीतर कार्यकर्ते तिसऱ्या पानिपतच्या युद्धाप्रमाणे सैराभर होतील हे दिसून येईल, असे दिसते.

भाजपा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष देशातील बलाढ्य पक्ष आहेत. परंतु या पक्षाच्या तालुक्यातील नेत्यांना स्वतःचा ठसा उमटविता आला नाही. स्वतःचे पॅनेल उभे करून कार्यकर्त्याची फळी गावोगावी उभा करण्याची संधी या पक्षाने गमावली आहे. या दोन्ही पक्षाला कृषी उत्पन्न बाजार समितीत एक एक जागा मिळाली आहे. परंतु हे दोन्ही विजयी उमेदवार एक बापूंच्या विचाराचा तर एक शेकापच्या विचाराचा असल्याची चर्चा असून या दोन्ही पक्षाला त्यांच्या पदरी काहीच नसल्याची चर्चा आहे.

पुरोगामी असल्याचे सिद्ध करा : ठोकळे
सांगोला तालुक्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना दलित, मुस्लिम, मागासवर्गीयांची मते चालतात. मात्र, त्यांना महत्त्वाच्या पदांवर योग्य प्रतिनिधित्व दिले जात नाही. हे प्रतिनिधित्व देण्याची नैतिक जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. सहकारी संस्थांसाठी दलित, मुस्लिम मागासवर्गीय मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची मते चालतात मात्र त्यांना अध्यक्षपद दिले जात नाही. हे खरेदी विक्री संघ, सूतगिरणी, औद्योगिक वसाहत निवडणुकीत दिसून आले आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांचे वारसदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी शेकापने मागासवर्गीय कार्यकर्त्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष करावे, असे मत बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा

शरद पवारांनी अध्यक्षपद का सोडले?

दीपकआबा झाले भावूक

पवारसाहेब, निवृत्त व्हा… पण १६ महिन्यांनंतर…

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका