थिंक टँक स्पेशलराजकारण

दीपकआबा झाले भावूक

निर्णय मागे घेण्याची पवार साहेबांना विनंती

Spread the love

दीपकआबा साळुंखे पाटील आणि खासदार शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. आपले राजकीय दैवत म्हणून ते शरद पवार यांना आजपर्यंत मानत आलेले आहेत. 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून उभे होते. या निवडणुकीत दीपकआबा साळुंखे पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील हे भावुक झाले. त्यांनी पवार साहेबांना विनंती करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. Why did Sharad Pawar leave the post of President?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा खळबळजनक निर्णय घेतला. हा निर्णय राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी, नेत्यांसाठी खूपच धक्कादायक समजला जात आहे. NCP leader Sharad Pawar

सांगोला तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनाही हा निर्णय धक्कादायक होता. माध्यमांमध्ये खासदार पवार यांच्या बाबतच्या बातम्या पाहून  दीपकआबा साळुंखे पाटील हे अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने एक व्हिडिओ जारी करून खासदार शरद पवार यांना आपण घेतलेला निर्णय मागे घ्यावा असे आर्जव करणारी विनंती केली आहे.

दीपकआबा साळुंखे पाटील आणि खासदार शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. आपले राजकीय दैवत म्हणून ते शरद पवार यांना आजपर्यंत मानत आलेले आहेत. 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून उभे होते. या निवडणुकीत दीपकआबा साळुंखे पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते.

ते जिल्ह्याचे अध्यक्ष असल्याने त्यांच्यावर शरद पवार यांनी प्रचाराची संपूर्ण जबाबदारी टाकली होती. ती जबाबदारी दीपकआबा साळुंखे पाटील यांनी अत्यंत ताकतीने निभावली होती. माढा लोकसभा मतदारसंघातील गावे न गावे पिंजून काढली. शरद पवार यांच्या सर्व सभांचे तसेच प्रचार दौऱ्याचे संपूर्ण नियोजन दीपकआबांकडे होते. शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्यही त्यांनी हजारो किलोमीटर केले.

शरद पवार यांच्यावर अत्यंत निष्ठा असणारा नेता म्हणून दीपक आबा यांची महाराष्ट्रात ख्याती आहे. दीपक आबा साळुंखे पाटील यांचे आणि शरद पवार यांचे ऋणानुबंध आहेत. सांगोल्याचे माजी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्यापासून पाटील कुटुंबियांचा पवार घराण्याशी जुना वारसा आहे.

सांगोला तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय घडामोडीत शरद पवार हे दीपक आबांना विचारून निर्णय घेत आलेले आहेत. मागील काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली तेव्हापासून दीपकआबा हे राज्यात पक्षी वाढीसाठी सक्रिय होताना दिसतात.

शरद पवार यांनी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा घेतलेला निर्णय दीपकआबा यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. त्यांनी या व्हिडिओतून शरद पवार यांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती करताना दीपकआबा हे प्रचंड भावुक झाल्याचे दिसून आले. त्यांच्या चेहऱ्यावर खासदार पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे दुःख दिसून येत होते.

काय म्हणाले दीपकआबा
“आपण दोनच दिवसांपूर्वी सिल्व्हर ओकवर झालेल्या भेटीत सांगोला तालुक्याचा दौरा दिला होता. आम्ही इकडे दौऱ्याच्या तयारीला लागलो होतो. आपण महाराष्ट्रातील जनतेचे दैवत आहात. आपण पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय अत्यंत दुःखदायक आहे. आपण हा निर्णय मागे घ्यावा अशी हात जोडून विनंती करत आहे.”

पाहा व्हिडिओ

हेही वाचा

शरद पवारांनी अध्यक्षपद का सोडले?

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका