भाजपात गेलेले गाडीत झोपून जातात : राज ठाकरेंनी धू धू धुतलं
मुंबई : विशेष प्रतिनिधी
विकासासाठी सरकारमध्ये गेलो ही थाप आहे. छगन भुजबळांनी अनुभव अजित पवारांना सांगितले असतील. त्यामुळेच जेलमध्ये जाण्याऐवजी भाजपमध्ये गेलेले बरे असे अजित पवारांना वाटले असावे. भाजपात गेलेले गाडीत झोपून जातात असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी धू धू धुतलं.
मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे प्रश्र्नी पनवेल येथे मनसेने भव्य सभा आयोजित केली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर कडाडून टीका केली.
राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवर लावला आणि अजित पवार उडी मारून भाजपत गेले. ही जनतेची दिशाभूल आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत. नाशिकमध्ये रस्त्यावर एकही खड्डा नाही. मुंबई गोवा महामार्गासाठी १५ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. तरीही रस्ता झाला नाही. खोके म्हणणाऱ्या पक्षाने कोविड सोडला नाही. आंदोलनासाठी हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मी इथे आलो आहे.
राज ठाकरे म्हणाले..
– खोके म्हणणाऱ्याकडे कंटेनर आहेत.
– महामार्गाची कामे ही टक्केवारीचा धंदा.
– पुण्यात मराठी माणूस गुदमरतो आहे.
– निवडणुकीत मराठी माणूस भावनिक होतो.
– सगळं सुधारायच असेल तर माझ्या हातात सत्ता देवून बघा.
– खड्ड्यांचा त्रास होऊनही तुम्ही त्यांनाच मतदान का करता?
– कोकणी माणसाने कमी किमतीत जमिनी विकू नये.
– या सरकारला आकार उकार नाही.
– भाजपने इतरांचे आमदार न फोडता स्वतःचे आमदार निवडून आणावेत.
– आंदोलन असे करा की रस्ते झाले पाहिजेत.
– समृध्दी महामार्ग ४ वर्षात झाला… मुंबई गोवा महामार्ग का होत नाही
.