ताजे अपडेट

“गदर” पाहून बाहेर पडताच त्याचा काटा काढला

Spread the love

गदर टू हा शेवटचा चित्रपट मंगला टॉकीज येथे पाहिल्यानंतर, सव्वा बाराच्या सुमारास नितीन म्हस्के हे आपल्या घरी जायला निघालेले होते. तेवढ्यात त्यांना मारायसाठी लापून बसलेले आरोपी सागर कोळानट्टी आणि त्याच्या साथीदारने म्हस्के याच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांचा खून केला आणि मग त्यांनी तेथून पळ काढला.

पुणे : पूर्ववैमनस्यातून वादातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एकाला तलवारी, पालघन, लोखंडी हत्यार आणि दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातल्या मंगला टॉकिजच्या समोर रात्री सव्वाबार च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी ९ जणांवर शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून केल्यानंतर आरोपी तिथून पसार झाले आहेत. पोलिस त्या आरोपींचा शोध घेत आहे. नितीन मोहन म्हस्के खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सतीश आनंद वानखेडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

याप्रकरणी सागर कोळानट्टी उर्फ यल्ल्या (वय ३२), पंडित कांबळे (वय २७), मलिक कोळ्या उर्फ तुंड्या (वय २४), इम्रान शेख (वय ३२) आणि त्यांच्या सोबत इतर पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

घटनास्थळावरील छायाचित्र

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गदर टू हा शेवटचा चित्रपट मंगला टॉकीज येथे पाहिल्यानंतर, सव्वा बाराच्या सुमारास नितीन म्हस्के हे आपल्या घरी जायला निघालेले होते. तेवढ्यात त्यांना मारायसाठी लापून बसलेले आरोपी सागर कोळानट्टी आणि त्याच्या साथीदारने म्हस्के याच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांचा खून केला आणि मग त्यांनी तेथून पळ काढला.

ही घटना जुन्या भांडणाच्या वादातून झाल्याची माहिती आहे. आरोपीविरोधात खून करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. अशी प्राथमिक माहिती आहे. ही घटना रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली असून रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत. आरोपींचा शोध शिवाजीनगर पोलिस स्टेशन घेत आहेत आणि याचा पुढील तपास देखील पोलिस करत आहे.

अत्यंत गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका