राजकारण

ठाकरे गटाला धक्का, निलम गोऱ्हे शिंदे गटात

Spread the love

बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीश कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारीही सोपवली. एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी देखील ठाकरे गटाला (Thackeray Group) ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत. ही आताच्या घडीची महाराष्ट्रातील खळबळजनक घटना आहे.

कोण आहेत निलम गोऱ्हे?
पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएएमएसची पदवी घेतली आहे. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नीलम गोऱ्हे या सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. विधानपरिषदेत त्यांनी शिवसेनेच्या प्रतोद म्हणून काम पाहिलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात त्यांनी काम केलं आहे. शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. तसेच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या स्टार प्रचारक म्हणूनही त्या सक्रिय होत्या.

पहिल्या महिला उपसभापती नीलम गोऱ्हे
2002 ते 2008, 2008 ते 2014, 2004 ते आजपर्यंत विधानपरिषद सदस्या म्हणून कार्यरत आहेत. जून 2019 मध्ये उपसभापतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र विधानमंडळात तब्बल 55 वर्षानंतर विधानपरिषदेवर पहिल्या महिला उपसभापतीपदी बसण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. नीलम गोऱ्हे यांना 2014 च्या युती सरकारच्या काळात मंत्री मिळेल अशा चर्चा होत्या परंतु त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती.

राजकारण्यात येण्यापूर्वी नीलम गोऱ्हे समाजकार्यात सक्रिय होत्या. त्यांनी स्त्री आधार केंद्र व क्रांतिकारी महिला संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या त्या अध्यक्षा असून त्यांचं कार्यालय आहे. अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे.

असं का घडलं?
नागपूर अधिवेशनापासूनच याची सुरुवात झाली होती. उद्धव ठाकरे नागपुरात दाखल होताच, काही आमदारांनी नीलम गोऱ्हे यांची तक्रार केली होती. नीलम गोऱ्हे या उपसभापती असूनही आपल्याला बोलू देत नाहीत. आदित्य ठाकरेंच्या मुद्द्यावर ज्यावेळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाला घेरलं होतं. त्यावेळी उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांनी आपल्या आमदारांना बोलू द्यायला हवं होतं, असं आमदारांचं म्हणणं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही नीलम गोऱ्हेंना खडे बोल सुनावले होते, अशी माहितीही समोर आली होती.

त्यानंतर नीलम गोऱ्हेंचा शिंटे गटाकडे ओढा वाढत गेला. मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमांना त्या प्रोटोकॉल म्हणून उपस्थित असायच्या. तसेच, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नीलम गोऱ्हेंच्या पुण्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखरे दुपारी नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच, नीलम गोऱ्हेंसह ठाकरे गटातील आणखी दोन पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीश कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारीही सोपवली. एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका