सांगोल्यात मातंग तरुणीचा बौद्ध तरुणाशी विवाह
पंचशील अभियानाकडून घेतली धम्मदीक्षा

जातीप्रथा कायमची नष्ट करण्यासाठी आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. हे महत्त्व ओळखून पंचशील अभियानाकडून आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले जा•त आहे. त्याच अनुषंगाने सांगोला येथे एका मातंग समाजातील तरुणीचा बौद्ध तरुणासोबत विवाह झाला. आंतरजातीय, आंतरधर्मीय स्वरूपाचा हा विवाह सोहळा होता.
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सामाजिक सुधारणेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात बौद्ध धम्माकडे लाखो लोक आकर्षित होत आहेत. सांगोला तालुक्यात बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य पंचशील अभियानामार्फत करण्यात येत आहे. जुन्या चालीरीती सोडून बौद्ध धम्मानुसार विज्ञानवादी आचरण करण्यासाठी हे कार्य केले जात आहे. जातीप्रथा कायमची नष्ट करण्यासाठी आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. हे महत्त्व ओळखून पंचशील अभियानाकडून आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच अनुषंगाने सांगोला येथे एका मातंग समाजातील तरुणीचा बौद्ध तरुणासोबत विवाह झाला. आंतरजातीय, आंतरधर्मीय स्वरूपाचा हा विवाह सोहळा होता.
या विवाहाचे आयोजन पंचशील अभियानचे समन्वयक ॲड. सुनिल जगधने (वकील उच्च न्यायालय मुंबई) यांनी केले होते. या विवाह विधीचे संचलन अभियानचे संचालक सुनील कसबे मंगळवेढा यांनी केले. सांगली येथील मातंग समाजातील मुलगी प्रियांका केनचे आणि राजुरी ता. सांगोला येथील बौद्ध समाजातील निलेश कांबळे यांचा हा विवाह होता.
या दोघांचा धर्म वेगळा आहे. प्रियांका कंचे हिने हिंदू धर्माचा त्याग करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर तिला बौद्ध धम्मदीक्षा पंचशील अभियानचे समन्वयक ॲड. सुनिल जगधने यांनी देऊन दीक्षा प्रमाणपत्र सुगंधा होवाळ आणि उमेश होवाळ यांच्या हस्ते देण्यात आले. ” बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा महान ग्रंथ भेट अभियानमार्फत देण्यात आला.
या विवाह सोहळ्यास आरपीआयचे माजी तालुका अध्यक्ष रवी बनसोडे, पीएसआय सावंत साहेब, राजुरी गावचे अभियान संचालक आत्माराम काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जाती निर्मूलन कार्य पंचशील अभियान करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार हा विवाह सोहळा पार पडला असल्याची माहिती ॲड. सुनील जगधने यांनी दिली.