जागतिक महिला दिनानिमित्त क्रिएटिव्हिटी क्लबचे प्रशिक्षण
बापूसाहेब ठोकळे यांनी दिले प्रशिक्षण

जागतिक महिला दिनानिमित्त क्रिएटिव्हिटी क्लबचे प्रशिक्षण
सांगोला/नाना हालंगडे
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती सांगोला व प्रथम एज्युकेशन सोसायटी सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त क्रिएटिव्हिटी क्लबचे ट्रेनिंग घेण्यात आले.
यावेळी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मधील सर्व अधिकारी व कर्मचारी ,प्रभाग संघ व ग्रामसंघ अध्यक्ष,सचिव ,कार्याध्यक्ष, प्रभाग संघ मॅनेजर, सर्व crp व 50 गावातील शालेय विद्यार्थीनी उपस्थित होते.
कोल्हापूर क्लस्टर सांगोला ब्लॉकमधून 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मेंटर बापूसाहेब ठोकळे यांनी क्रिएटिव्हिटी क्लबचे ट्रेनिंग दिले.
या ट्रेनिंगमध्ये सांगोला ब्लॉकमधील 50 गावांतील सुमारे 157 च्या आसपास पहिला उपस्थित होत्या. या ट्रेनिंगमध्ये प्रथमची माहिती बापूसाहेब ठोकळे यांनी दिले. क्रिएटिव्हिटी क्लबची सर्व माहिती व ऍक्टिव्हिटीज याबतची माहिती नंदा रोकडे यांनी दिली.
YLP Trainor म्हणून विजय मांडवकर हे उपस्थित होते. महिलांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अशा पद्धतीने क्रिएटिविटी ट्रेनिंगची सर्टिफिकेट वितरण करून सांगता करण्यात आली.
यावेळी कृनाल महादेव पाटील तालुका अभियान व्यवस्थापक 9145647999, महंतवीर घाडगे 9271259541, महेश साठे 9503819914, किशोर बिडे 9730303728, सचिन भोसले 8554058386, राहुल माने 8006826846, सुजित हेगडे 7757968003, सुधीर पिसे 9404025954, दीपक गाडे 8308481914, अजित वाघमारे 9766065803 उपस्थित होते.