मुंबई : विशेष प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी आणि BRS (Bharat Rashtra Samiti Telangana state) या दोन पक्षात युती संदर्भात बोलणी सुरू असल्याची बातमी एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आली आहे. या बातमी मध्ये काहीही तथ्य नाही. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी तेलंगणा आणि महाराष्ट्रात संभाव्य युतीसाठी सध्या तरी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू नाही. तसेच BRS कडून तेलंगणा किंवा महाराष्ट्रात अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. BRS चा प्रस्ताव आल्यास वंचित बहुजन आघाडी युतीचा विचार करेल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. (VBA Leader Sidharth Mokale)
भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस हा पक्ष महाराष्ट्रात पाय रोवू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच केसीआर अर्थात के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao KCR) यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. पुढील महिन्यात आणखी मोठे दौरे होत आहेत. आगामी निवडणुकीसाठी बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी सविस्तर खुलासा केला आहे. (Will BRS and the VBA form an alliance?)
सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, तेलंगणा सरकारच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar VBA Leader) यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांचे नातू म्हणून बाळासाहेब आंबेडकर कार्यक्रमास उपस्थित होते. मात्र त्यात कुठलीही राजकीय चर्चा नव्हती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा उभारल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.
KCR यांच्या नेतृत्वाखालील BRS सरकारने राज्यातील प्रत्येक क्षेत्रात SC, ST, BC आणि अल्पसंख्याकांच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. संभाव्य राजकीय युतीसाठी BRS ने पुढाकार घेतल्यास, वंचित बहुजन आघाडी त्याबद्दल निश्चितपणे विचार करेल; BRS चा मताचा वाटा, लोकप्रियता आणि VBA च्या सामाजिक अजेंडाला चालना देण्यासाठी BRS काय करू शकते यासारखे अनेक घटक युती संदर्भात निर्णायक ठरतील.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी सविस्तर खुलासा केला आहे. पाहा व्हिडिओ…
तेलंगणातील निवडणुकीत त्यांना मदत करण्यासाठी आमच्याकडे मतदारांचे संख्याबळ आहे पण BRS हा VBA साठी महाराष्ट्रात किती उपयुक्त सहयोगी असू शकतो हा ही आमच्यासमोर प्रश्न आहे. मात्र BRS कडून युती संदर्भात प्रस्ताव आल्यास नक्कीच वंचित बहुजन आघाडी त्याचा विचार करेल, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.