थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी मूळचे गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूरचे विद्यमान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या जागी आता कुमार आशीर्वाद रुजू होणार आहेत.
कुमार आशीर्वाद यांनी गडचिराेली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दमदार कामगिरी केली आहे. कुमार आशिर्वाद यांनी IIT खरगपूर येथून शिक्षण घेतले आहे. ते 2016 च्या IAS rank 35 चे अधिकारी आहेत.
विद्यमान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बदली महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी स्टेट हेल्थ इन्शुरन्स सोसायटी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या कार्यकालात अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेत आपली कामगिरी चमकदार केली. त्यांच्याच कार्यकाळात सात रस्ता परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाची भव्य आणि सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे. त्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. मिलिंद शंभरकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासनाला शिस्त लावण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जि. प. कार्यकारी अधिकारीपदी मनीषा आव्हाळे
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरला बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.