आरोग्य

सोलापूरच्या प्रा. ज्योती वाघमारेंनी करून दाखवलं

शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद

Spread the love
  • शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद
  • 40 डॉक्टरांचा ताफा
  • 10 हजार 288 कामगारांची मोफत आरोग्य तपासणी
  • औषधोपचार आणि चष्मे वाटप

शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात तब्बल ४० डॉक्टर आणि १२३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा बजावली. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, महापालिका आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला. या शिबिराचा बुधवारी तब्बल 10 हजार 288 कामगारांनी लाभ घेतला.

सोलापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका लावला आहे. शिवसेना सोलापूर शहर आणि जिल्हातर्फे मोदी येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास बुधवारी प्रचंड प्रतिसाद मिळाला. विविध तपासणी आणि औषधोपचारासाठी हजारो कामगारांनी दिवसभर गर्दी केली होती. प्रा. ज्योती वाघमारे यांच्या नेटक्या नियोजनामुळे हजारो रुग्णांना कोणत्याही त्रासाविना या आरोग्य शिबिराचा लाभ मिळाला. प्रा. ज्योती वाघमारे यांनी करून दाखविलं अशाच शब्दांत त्यांच्या या कार्याची वर्णन करावे लागेल.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने राज्यभर महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र बुधवारी मोदी येथे झालेले महाआरोग्य शिबिर हे झोपडपट्टी भागातील राज्यातील पहिलेच महाआरोग्य शिबिर ठरले.

या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख मनोज शेजवाल, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या शिबिर संयोजिका प्रा. ज्योती वाघमारे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संयोजक प्रियदर्शन साठे, युवा सेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता सावंत, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, महिला आघाडी शहर प्रमुख जयश्री पवार, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख सूरज जम्मा, रविना राठोड, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, माधुरी कांबळे, ज्योतिबा गुंड, सागर शितोळे, ज्योतिबा गुंड, अर्जुन शिवसिंगवाले, सुजित खुर्द, तुकाराम मस्के, शिवाजी नीळ, जवाहर जाजू आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत म्हणाले, गोरगरीब, कष्टकरी कामगारांना आरोग्य सुविधा त्यांच्या घरापर्यंत मिळाव्यात या हेतूने शिवसेनेतर्फे महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात कामगारांनी तपासणी करून औषधे घेतल्यानंतर पुढील उपचारही त्यांना देण्यात येणार आहेत. वर्षभर विविध ठिकाणी अशा शिबिरांचे आयोजन होणार असल्याचेही प्रा. सावंत यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात दात, नाक, कान, घसा तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू, लहान मुलांचे आजार, स्त्रीरोग, त्वचारोग, हृदय, ईसीजी, रक्तदाब, मेंदूच्या विविध तपासण्या, मधुमेह किडनी व लिव्हर अशा तपासण्या करण्यात आल्या.

महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम भीम वाघमारे, आशिष परदेशी, दीपक पाटील, अभिजित काळे, गणेश तूपडोले, अल्फ्रान आबादीराजे, सय्यद म्हेत्रे, महेश कंपली, मनोज पोतराज, प्रद्युम्न वाघमारे, अभिषेक वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका