
सांगोला/ नाना हालंगडे
डिकसळ गावचे सुपुत्र दोघेही आश्रम शाळेचे सचिव अन् संचालक पण दोघांचेही अकाली निधन झाले. अक्षरश: संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांच्याच स्मृती जपण्यासाठी हंगीरगे येथील केदारलिंग परिवाराचे सर्व्हेसर्वा, झाडवाले बाबा ग्रामसेवक बिभीषण सावंत यांनी आज या दोघा सरांच्या स्मृती जपण्यासाठी आश्रम शाळेच्या प्रांगणात दोन महाकाय वडाची झाडे लावून येथेच अस्ती विसर्जित करून वृक्षारोपण केले.
डिकसळ गावची ओळख ही जिल्ह्यात आश्रमशाळेमुळेच आहे. पण याच शाळेतील दोन अनमोल हिरे, अचानक काळाच्या पडद्याआड झाले. या संस्थेचे सचिव प्रा. राणोबा करांडे यांचे 9 एप्रिल रोजी व तज्ञ संचालक मधुकर बाबर सर यांचे 11 एप्रिल रोजी निधन झाले होते. हे दोघेही जिवलग मित्र होते. विशेष म्हणजे दोघेही अटॅकनेच गेले. आजही संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत आहे.
पण गेली 10 वर्षाहून अधिक काळापासून मृत व्यक्तीच्या नावे झाड लावणारे ग्रामसेवक अवलिया ठरित आहेत. आज बाबर सरांचा तिसरा दिवस झाला. त्यांच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीनंतर दोघाही सरांच्या आठवणी जपण्यासाठी आश्रमशाळेच्या प्रांगणात करांडे व बाबर परिवारास सोबत घेवून या वृक्षांची लागण करण्यात आली.
यावेळी पुरोगामीचे राज्यअध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, इंजी.रमेश जाधव, ॲड.मारुती धाळे, मनोज ढोबळे, तुकाराम भुसनर, ग्रामसेवक बिभीषण सावंत, काकासाहेब करांडे, बंडू वाघमोडे, गणेश पाटील, पिंटू भुसनर, सोपान करांडे, अशोक करांडे, शेखर साळुंखे,संदीप भुसनर, माजी उपसभापती सुनील चौगुले, रासपचे सोमा मोटे, पिंटू पुकळे यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.