
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
मंथन वेलफेअर फौंडेशन, अहमदनगर यांच्या वतीने ५फेब्रुवारी2023 रोजी घेण्यात आलेल्या, राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सांगोला तालुक्यातील डिकसळ आश्रम शाळेचा पहिलीतील विद्यार्थी प्रज्वल काकासाहेब करांडे याने १५० पैकी१४० गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक पटकावला.
याच प्रज्वलने यापूर्वीही पहिलीत प्रवेश घेण्याअगोदर ही याच परीक्षेत यश प्राप्त केले होते. प्रज्वल करांडे हा याच प्रशालेतील आदर्श शिक्षक काकासाहेब करांडे यांचा मुलगा आहे. तल्लख बुद्धीचा हा प्रज्वल पाहिलीत असला तरी, खूपच हुशार आहे.
डिकसळ आश्रमशाळा ही जिल्ह्यात अव्वल असून सतत विविध परीक्षा, क्रीडा स्पर्धा यामध्ये यांचे विद्यार्थी चमक दाखवीत आहेत.
प्रज्वल करांडे हा इयत्ता पाहिलीत शिक्षण घेत आहे. परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या स्कालरशिप परीक्षेच्या धर्तीवर इयत्ता १ली ते ८वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी परीक्षा घेतली जाते. भविष्यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना पाया मजबूत करण्याचे काम या परीक्षेच्या माध्यमातून केले जाते.
प्रज्वल याने राज्यात सहावा क्रमांक पटकाविल्याने मुख्याध्यापक तुकाराम भुसनर,मुख्याध्यापक शिवाजी कुंभार यांच्यासह संस्थचे अध्यक्ष, सचिव,सर्व संचालक यांनी अभिनंदन केले.