गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी पत्र लिहिलं
देवेंद्र फडणवीसांचा टीकाकारांवर पलटवार
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
महात्मा गांधी यांनीही सावरकरांच्या बंधूंना पत्र लिहून सावरकरांना इंग्रजांकडे अर्ज करण्यास सांगितलं होतं. सगळे राजकीय बंदी सोडून दिले जात होते. परंतु सावरकरांना सोडलं जात नव्हतं. गांधींनी यावर लेखही लिहिल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या टीकाकारांवर पलटवार केला. Deputy Chief Minister Devendra Fadnavis hit back at Savarkar’s critics.
राहुल गांधी हे सातत्याने सावरकरांचा अवमान करत असल्याने राज्यात शिवसेना-भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. चारकोपमध्ये नुकतीच ही यात्रा निघाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
ना. फडणवीस म्हणाले की, काही लोक म्हणतात सावरकरांनी माफी मागितली. परंतु ते सत्य नाही. सावरकरांनी कैद्यांच्या वतीने इग्रजांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी तसा उल्लेख केल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, महात्मा गांधी यांनीही सावरकरांच्या बंधूंना पत्र लिहून सावरकरांना इंग्रजांकडे अर्ज करण्यास सांगितलं होतं. सगळे राजकीय बंदी सोडून दिले जात होते. परंतु सावरकरांना सोडलं जात नव्हतं. गांधींना यावर लेखही लिहिल्याचं फडणवीस म्हणाले.
सावरकर यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक स्वातंत्र्य सेनानींचा आपण उदो-उदो करतो. परंतु त्यावेळी त्यांना तुरुंगात सगळ्या सोई-सुविधा मिळायच्या. त्यांचा कूक तिथे असायचा, वाचायला पेपर असायचा. इतर सुविधा त्यांना मिळायच्या, परंतु सावरकरांचा केवळ छळ झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
जेलमध्ये सावरकरांचा अनन्वित छळ
काही लोक म्हणतात त्यांनी माफी मागितली. अर्जामध्ये शेवटी सावरकर म्हणतात, जे बाकीचे कैदी आहेत त्यांच्या वतीने विनंती करतो इतरांना सोडून द्या. हा केलेला अर्ज इतर कैद्यांच्या वतीने करण्यात आलेला होता. महात्मा गांधींनी सावकरांच्या बंधूंना पत्र पाठवून सांगितलं- सावरकरांना अर्ज करायला सांगा, सगळे राजकीय बंदी सोडून दिले जात आहेत. अनेक स्वातंत्र्यसेनानी यांचा आज आपण उदोउदो करतो. परंतु त्यांना तुरुंगात सगळ्या सोई सुविधा असायच्या. त्यांना कूक तिथे असायचा. वर्तमानपत्र वाचायला मिळायचं. त्यांचाही आदर आम्ही करतो. परंतु सावकरांना कसलीच मुभा मिळाली नाही. जेलमध्ये सावरकरांचा अनन्वित छळ केला.
महात्मा गांधींनीही सावरकरांना सोडण्याची भूमिका घेतली होती. सावरकरांनी जीवनातील २८ वर्षे जेलमध्ये काढले. जेलमधून बाहेर आल्यावर सावरकरांनी समाजसेवेचं कार्य सुरु ठेवलं. सावरकरांनी खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठ हिंदूत्व मांडलं. प्रथा, परंपरा आणि जातींना झुगारुन देणारे सावरकर होते. अस्पृश्यांसाठी सावरकरांनी काम उभं केलं होतं. मराठीला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे सावरकर होते. सावरकरांबद्दल काँग्रेसला नेहमीच भीती वाटते. मराठी भाषेला सावरकरांनी शेकडो शब्द दिले आहेत. सावरकरांनी अर्ज केला होता तो इतर कैद्यांसाठी. काँग्रेसकडून रोज सावरकरांचा अपमान होतो. उद्धव ठाकरेंचा स्वाभिमान केवळ शब्दांमधला आहे. ‘आम्ही हे सहन करणार नाही’ असं म्हणून काहीही होत नाही.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खणखणीत ट्विट करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विटमध्ये म्हणतात की,
“राहुल गांधी तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर नाही आणि तुम्ही गांधीही नाही. सावरकर होण्याची तुमची औकात नाही. संसदेत बंगालच्या खासदाराने जेव्हा वीर सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडला, तेव्हा त्याचे समर्थन करणारे तुमचे आजोबा होते, फिरोज गांधी.”
“इंग्लंडच्या राणीची मर्जी होईल, तेव्हा स्वातंत्र्य मिळेल, अशी धारणा नव्हती. स्वातंत्र्य आम्हाला भीकेत नको होते. त्यामुळे सशस्त्र क्रांती झाली. वीर सावरकर यांनी 1857 च्या स्वातंत्र्यसमरावर पुस्तक लिहिले. त्याने लाखो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली.”
“एकाच व्यक्तीला दोन जन्मठेप झाल्या, असे वीर सावरकर एकमात्र आहेत. त्या शिक्षा झाल्या, तेव्हा इतके वर्ष तुमचे सरकार तरी चालणार आहे का, असे इंग्रजांना विचारण्याचीही हिंमत वीर सावरकरांनी दाखविली होती.”
“सगळे स्वातंत्र्यसेनानी महान आहेत. पण, वीर सावरकरांनी ज्या यातना भोगल्या, त्या कुणाच्या वाट्याला आल्या नाहीत. वीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन व्यक्तींना कायमच काँग्रेसने विरोध केला.”
“अंधश्रद्धेच्या विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधात वीर सावरकरांनी लढा दिला. हिंदूत्त्वाचा विज्ञाननिष्ठ विचार मांडणारे वीर सावरकर होते. मराठी भाषेला शेकडो शब्द देणारे वीर सावरकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर आरती लिहिणारे सुद्धा वीर सावरकरच होते.”
“वीर सावरकरांचा वारंवार अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे लोक आहेत, हे मात्र दुर्दैवी आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जसे मणिशंकर अय्यरच्या फोटोला जोडे मारले, तसेच तुम्हीही राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत दाखविली असती, तर मानले असते.”
राहुल गांधी तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर नाही आणि तुम्ही गांधीही नाही.
सावरकर होण्याची तुमची औकात नाही.संसदेत बंगालच्या खासदाराने जेव्हा वीर सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडला, तेव्हा त्याचे समर्थन करणारे तुमचे आजोबा होते, फिरोज गांधी : देवेंद्र फडणवीस…
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 3, 2023