सांगोल्यात खा.शरद पवारांच्या हस्ते होणार आ. रविंद्र धंगेकरांचा सत्कार
७ मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या नुकत्याच पार पडलेल्या व सुमारे तीस वर्षापासुन भाजपाचा गड मानला जात असलेल्या, कसबा विधानसभा मतदार संघातुन भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावुन,हा गड काबीज करुन,जाॅईंट कीलर म्हणुन पुढे आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार आम.रविंद्र धंगेकर यांचा महाराष्ट्र राज्य लोणारी समाज व सांगोला तालुका लोणारी समाज सेवा संघाच्या वतीने भव्य सत्कार समारंभ दिनांक ७ मे २०२३ रोजी सांगोला शहरात संपन्न होत आहे.
आ.रविंद्र धंगेकर हे अखिल लोणारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष असुन लोणारी समाजामध्ये त्यांना प्रचंड मानाचे स्थान आहे.संपुर्ण महाराष्ट्रात लोणारी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असुन प.महाराष्ट्रातील विशेषत्वाने माणदेश पट्ट्यात लोणारी समाजाची संख्या खुप मोठ्या प्रमाणावर आहे.कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातुन निवडणुक लढवुण आ.रविंद्र धंगेकर हे मोठ्या मताधिक्याने निवडुन आले.
सर्वत्र चर्चिले गेलेल्या या निवडणुकीत धंगेकरांनी घवघवीत विजय खेचुन आणल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजात आनंदाचे वातावरण तयार झाले व एक जोश निर्माण झाला आहे.समाजाचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडणारा आपल्या समाजातील नेता असावा ही या समाजाची गेली अनेक वर्षापासुनची इच्छा आ.धंगेकरांच्या रुपाने पुर्ण झाली आहे.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोणारी समाजाची लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे शिवाय सर्व समाज बांधवांना सांगोला हे ठिकाण मध्यवर्ती होत असल्यामुळे या तालुक्यात आ.धंगेकरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्याची तयारी महाराष्ट्र राज्य लोणारी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.धंगेकरांनी जे यश खेचुन आणले आहे त्यास साजेसा त्यांचा सन्मान सोहळा करण्याचे समाजाच्या वतीने तयारी केली असुन,या सन्मान सोहळ्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम.दिपकआबा साळुंखे यांच्याकडे संपूर्ण लोणारी समाजाच्या शिष्टमंडळाने साहेबांच्या हस्ते आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार व्हावा ही इच्छा व्यक्त केल्यानंतर मा.दिपकआबांच्या पुढाकाराने लोणारी समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मा.शरदचंद्रजी पवार यांची भेट घेवुन त्यांना या सत्कार सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.
या प्रसंगी मा.खा.शरद पवार यांनी लोणारी समाजाचे आपल्या व पक्षाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान असल्याचे कबुल केले. या समाजाबद्दल आपणास सुरुवातीपासुनच जिव्हाळा व प्रेम असल्याचे सांगुन बारामती मतदार संघातील पवार साहेबांचे सुरवातीच्या काळातील सवंगडी लोणारी समाजाचे नेते नाथा गिते यांनी पवार साहेबांच्या राजकीय कारकीर्दीतील दिलेल्या योगदानाची प्रशंसा करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.लोणारी समाजाने दिलेले हे निमंत्रण त्यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारले असुन दिनांक ०७ मे २०२३रोजी हा भव्य सोहळा करण्याचे सुनिश्चीत करण्यात आला आहे.
कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्यावर संपूर्ण लोणारी समाजाचे खूप प्रेम होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यावर सुद्धा लोणारी समाजाचे खूप प्रेम आहे म्हणून तोच वसा पुढे चालू ठेवत या समाजाला कायम न्याय देण्याचा प्रयत्न मा.आ.दिपकआबांनी केला आहे.
मा.आ. दिपकआबांच्या सोबत लोणारी समाजाच्या शिष्टमंडळामध्ये मा.नवनाथ राणगट(नगरसेवक पंढरपूर न.पा.), नामदेवराव बजबळकर,मा.विलास घेरडे सर भिमराव घेरडे सर ,इंजि.अशोक नरळे(फलटणे), गणपत महांकाळ, विजय भुत्ता आदि लोणारी समाज बांधवांचे शिष्टमंडळ उपस्थीत होते. मा आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पुढाकाराने आ.रवींद्र धंगेकर यांच्या नागरी सत्काराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची वेळ मिळाल्यामुळे समस्त लोणारी समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.