ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण

“डिग्री काय, हा माणूसच बनावट!”

फॉण्टवर संशय घेऊन काँग्रेसचा बॉम्ब

Spread the love

महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्वीट करत “डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक (बनावट) आहे” असं म्हटलं आहे. संबंधित ट्विटमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा फोटो ट्वीट केला आहे. संबंधित पदवीत वापरलेला फॉन्ट हा १९९२ साली तयार करण्यात आला. मात्र, हा फॉन्ट पंतप्रधान मोदी यांच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा काय? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्कशिटवर वापरण्यात आलेला फाँट १९९२ साली डेव्हलप झालेला आहे. मोदींचे प्रमाणपत्र १९८३ सालाचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या १९८३ सालच्या पदवी प्रमाणपत्रावर १९९२ साली डेव्हलप झालेला फॉन्ट वापरला? डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे.” असे ट्वीट करत महाराष्ट्र काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. या ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. In a tweet, the Maharashtra Congress said, “What degree, Modi is a fake person”.

केजरीवाल प्रकरणाने चर्चेला वाव
मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीवरून वाद सुरू आहे. विरोधी पक्षातील विविध नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर संशय व्यक्त केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत मोदींच्या पदवीची माहिती मागवली होती. पण विद्यापीठाने नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती देण्यास नकार दिला. याउलट गुजरातमधील न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांनाच २५ हजारांचा दंड ठोठावला.

महाविकास आघाडीत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेवर संशय घेणे चुकीचे असल्याचे मत नुकतेच व्यक्त केले आहे. पंतप्रधानांना निवडून देताना लोकांनी डिग्री पाहिली नव्हती असे सांगत अजित पवार यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधानांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत संशय घेणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते.

फ्रेम करून नवीन संसदेच्या दारावर लावा
महाराष्ट्रासह देशातील विविध नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर संशय व्यक्त केला. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही पदवीवरून पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला. “आपल्या पंतप्रधान मोदी यांची पदवी बोगस आहे, असे लोक म्हणतात. पण राज्यशास्त्रज्ञांनी याविषयावर संशोधन करून ही पदवी ऐतिहासिक आणि क्रांतीकारी असल्याचं मत मांडलं आहे. त्यामुळे त्याची एक प्रत फ्रेम करून नवीन संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली पाहिजे. यामुळे जनता पंतप्रधानांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

प्रमाणपत्र १९८३ चे, फॉन्ट १९९२ चा
यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्वीट करत “डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक (बनावट) आहे” असं म्हटलं आहे. संबंधित ट्विटमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा फोटो ट्वीट केला आहे. संबंधित पदवीत वापरलेला फॉन्ट हा १९९२ साली तयार करण्यात आला. मात्र, हा फॉन्ट पंतप्रधान मोदी यांच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा काय? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले, “जो फॉन्ट १९९२ साली तयार करण्यात आला, तो फॉन्ट मोदींच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा? डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे.” हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

संशय घेऊ नका : अजित पवार
दरम्यान महाविकास आघाडीत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेवर संशय घेणे चुकीचे असल्याचे मत नुकतेच व्यक्त केले आहे. पंतप्रधानांना निवडून देताना लोकांनी डिग्री पाहिली नव्हती असे सांगत अजित पवार यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधानांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत संशय घेणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते.

एका बाजूला काँग्रेसचे नेते नरेंद्र मोदी यांच्या गुणपत्रकाच्या वादात आघाडीवर राहून जोरदार हल्लाबोल करत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले हे वक्तव्य दोन्ही पक्षातील विसंवाद व्यक्त करणारे आहे.

(सदरच्या बातमीत व्यक्त झालेल्या मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत नाही.)

महाराष्ट्र काँग्रेसचे ट्वीट

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका